ब्रेकिंग न्यूज

सुटीवर घरी आलेल्या जवानाचा नदीत बुडून मृत्यू 

Spread the love

दर्यापूर   (अमरावत) / प्रतिनिधी 

                    सुटीवर गावी आल्या नंतर मित्रांसोबत नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या जवानाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ते आपल्या तीन मित्रांसमवेत नदीवर आंघोळीसाठी गेले होते. चारही मित्र नदीत उतरले. पण गोपाल रामदास वानखडे  हे नदीतून बाहेर न आल्याने मित्रांनी आरडाओरड केली. पण त्यासाठी बराच उशीर झाला होता.
  या जवानाच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता लागलेला नाही. शोध सुरू आहे
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ इथं ही घटना घडली. गोपाल रामदास वानखडे असं मृत जवानाचं नाव आहे. गोपाल रामदास वानखडे सासन रामापूर येथील रहिवासी होते ते  नुकतेच सुट्टीवर गावी आले होते. आज दुपारी सासन रामापूरमधील आपल्या तीन ते चार  मित्रांसोबत ते हे पूर्णा नदीवर पाच वाजेच्या दरम्यान आंघोळीला गेले होते. नदीपात्रात आंघोळ करत असताना तीन व्यक्ती पाण्यातून बाहेर निघाले. मात्र गोपाल वानखडे हे पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला.
ही घटना रामतीर्थ ग्रामस्थांना कळताच त्यांनी नदीपात्रावर धाव घेतली. या संदर्भात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र तब्बल दोन तास महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता. त्यामुळे जवान गोपाल वानखडे यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यास विलंब लागला. संध्याकाळी 7 वाजता दरम्यान प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र सायंकाळचा वेळ झाल्याने मृतकाला बाहेर काढण्यास अपयश आलं. घटनास्थळी अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे हे सुद्धा दाखल झालेले होते. वानखेडे यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वानखेडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close