Uncategorized

अनैतिक संबंध ; नवऱ्याचा मृत्यू शक्तिवर्धक गोळ्याच्या ओव्हरडोज मूळे झाल्याचा बनाव

Spread the love

पण पीएम रिपोर्ट वरून पोलिसांनी बदलली तपासाची दिशा

कानपूर / नवप्रहार ब्युरो 

                   शबाना आणि रेहान ची मैत्री सोशल मीडियावरून झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे शबाना तिचा पती आबीद जेव्हा जेव्हा घराबाहेर जायचा तेव्हा तेव्हा रेहान ला घरी बोलावून घ्यायची.. रेहान ला नेहमी नेहमी शबाना च्या घरी पाहून शेजाऱ्यांना शंका यायला लागली. त्यांनी ही बाब आबीद च्या कानावर घातली. त्यामुळे आबीद ने शबाना ला विरोध सुरू केला. यामुळे शबाना आणि रेहान ने आबीद ला मार्गातून हातावण्याचा प्लॅन आखला. आणि तो सक्सेस ही केला. पण शबाना ने आबीद चा मृत्यू शक्तीवर्धक गोळ्याच्या ओव्हरडोज मुळे झाला हे भासवण्याचा प्रयत्न केला त्यात ती यशस्वी देखील झाली. पण पीएम रिपोर्ट आल्या नंतर मात्र त्यांचे बिंग फुटले.

 महत्वाचे असे की शबाना ने पोलिसांना कॉल करून पतीच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला असता त्याच्या शरीरावर जखमा किंवा  मारल्याचे व्रण न आढळक्याने पोलिसांनाही सुरुवातीला  ओव्हडोसची थ्योरी योग्य वाटली. पोस्टमार्टमनंतर मृतदेहाच दफन करण्यात आलं. पुढच्याच दिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर ते वाचून पोलिसांना धक्काच बसला. त्यामध्ये हत्येच कारण काही दुसरच होतं. उत्तर प्रदेश कानपूरच हे प्रकरण आहे. कानपूरच्या बिठूर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. आबिद अली पत्नी आणि मुलासोबत रहायचा. 19 जानेवारीला आबिदची पत्नी शबानाने पोलिसांना कळवलं की, नवऱ्याचा शक्तीवर्धक औषधाच्या ओव्हरडोसने मृत्यू झालाय.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. आबिदच्या खिशात शक्तीवर्धन कॅप्सूलचे रॅपर मिळाले. शरीरावर कुठलीही जखम नव्हती. त्यावेळी पोलिसांना असं वाटलं की, कदाचित शबाना खरं बोलतेय. पती आबिद अलीच्या मृत्यूवर शबाना खूप रडली. ती खूप दु:खात आहे, असं कुटुंब आणि पोलिसांना वाटलं पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबियांनी दफनविधी केला. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण दुसऱ्यादिवशी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर शबानाचा पोलखोल झाली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून मृत्यू झाल्याच म्हटलं होतं. त्यामुळे ओव्हरडोसची कथा रचण्यात आल्याच स्पष्ट झालं.

त्या रात्री काय झालेलं?

पोलिसांनी शबानाची कसून चौकशी केली. तिच्या मोबाइलचे कॉल डिटेल तपासले. त्यावेळी समजलं की, त्या रात्री शबानाच रेहान नावाच्या युवकाबरोबर बोलण झालं होतं. पोलिसांनी रेहानला उचललं. दोघांच्या चौकशीतून सत्य समोर आलं. शबाना आणि रेहानची मैत्री वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर झाली. आबिद घरी नसताना तो शबानाला भेटायला यायचा. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. आबिदला समजल्यानंतर त्याने विरोध सुरु केला. त्यानंतर दोघांनी मिळून आबिदला मार्गातून हटवण्याचा प्लान केला.

पण सत्य समोर आलच

गुन्ह्याच्या रात्री आबिद झोपल्यानंतर शबानाने रेहान आणि त्याचा मित्र विकासला घरी बोलावलं. त्यानंतर तिघांनी गळा दाबून आबिदची हत्या केली. हत्येचा संशय येऊ नये म्हणून शक्तीवर्धक कॅप्सूलच्या सेवनाच्या ओव्हरडोसने मृत्यू झाल्याच दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सत्य समोर आलच.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close