गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसेसह अंदाजे ४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त
हिवरखेड पोलिसांची कारवाई
हिवरखेड / बाळासाहेब नेरकर
हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दि.२३/०१/०२५ रोजी गुप्त माहीती मिळाली की झरी बाजार येथुन हिवरखेड येथे एक लक्झरी क एम पी ५० पी ११६८ चालक देशी गावठी पीस्टल घेवुन लक्झरी गाडी चालवत आहे,या माहीती वरून ठाणेदार गजानन राठोड यांचे मार्गदर्शनात पोलीस उप-निरीक्षक गोपाल पांडुरंग गिलबिले , पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, पोहवा गणेश साबळे, पोहवा प्रमोद चव्हाण पोहवा प्रफुल पवार, पोकों सर्वेश कांबे यांनी झरी बाजार हिवरखेड रोडवर हिवरखेड पासुन ०१ की. मी. अंतरावर नाकाबंदी केली असता एक पिवळ्या रंगाची खाजगी ३२ सीटर लक्झरी गाडी मिळुन आली सदर वाहण चालक नामे शेख शरीफ शेख मजीद वय ३० वर्षे रा. मुन्द्रा ता.खकणार जि.बऱ्हाणपुर यांचे ताब्यातुन गावठी बनावटीचे अग्णीशस्त्र (पीस्टल) व गाडी मधुन ०४ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर पीस्टल व ०४ जिवंत काडतुस तसेच ३२ सिटर लक्झरी वाहण क एम पी ५० पी ११६८ असे एकुन किंमत ४ लाख ५० हजार ४०० रू. चा मुददेमाल जप्त करून नमुद आरोपी वर पोस्टेला अपं.नं १४/०२५ कलम ३,२५ शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून नमुद आरोपी यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे साहेब , सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात सपोनी गजानन राठोड ठाणेदार पो.स्टे. हिवरखेड यांनी व त्यांचे टीममधील अधिकारी व अमलदार पोलीस उप-निरीक्षक गोपाल गिलबिले, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव, पोहवा गणेश साबळे, पोहवा प्रमोद चव्हाण पोहवा प्रफुल पवार, पोकों सर्वेश कांबे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि गोपाल गिलबिले पोस्टे हिवरखेड हे करीत आहेत.