निवासी अंध विद्यालय खानापूर ने गाजविली जिल्हा स्तरीय कि्डा स्पर्धा
हिवरखेड:- (जितेंद्र ना फुटाणे):- दिव्यांगाच्या जिल्हा स्तरिय कि्डा स्पर्धा नुकत्याच 15,16,17 जानेवारी2025 ला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे पार पडली त्यामध्ये मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील 16 विद्यार्थी व विद्यार्थीनी नी भाग घेतला त्यापैकी 3 विद्यार्थ्यांनी सुवर्ण 10 विद्यार्थ्या नी रजत तर 2 विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकावले कु पुनम कुमरे हिने गोळा फेक तसेच 100मिटर धावने प्रकारात सुवर्ण, रामनाम उईके याने उभे राहुन लांब उडी मारून सुवर्ण पटकावले तर मिथिलेश उईके 100 मिटर धावणे, युवराज काकडे गोळा फेक मध्ये , फुलवंती भलावी लांब उडीमध्ये, आशा जावरकर 50 मिटर धावणे, अनिका पाटील 25 मिटर धावणे, गोपाल जावरकर25 धावणे , अनुज धुर्वे 50 धावणे, शिवकुमार धुर्वे पासिंग द बाँल, कांता धोटे पासिंग द बाँल, तसेच अनुष्का उईके 25 मिटर लावणे यांनी रजत पदक पटकावीले या यशाचे श्रेय विद्यार्थी शाळेचे संस्थापक,मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना देतात