आरोग्य व सौंदर्य

जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने टी.बी १०० दिवस विशेष मोहिमे अंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न

Spread the love

प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा यांचे आयोजन”

वाशिम ; जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम क्षयरोग विभाग केंद्र यांच्याकडून टी बी १०० दिवस विशेष मोहिम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन ही केले जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा क्षयरोग विभागा व राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला व रांगोळी स्पर्धा चे आयोजन दिनांक १४ जानेवारी २०२०२५ ते १५ जानेवारी २०२५ दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्री.बाकलीवाल महाविद्यालय येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून मोठा सहभाग नोंदविला होता.तर श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी रांगोळी काढत टी.बी १०० डे प्रोग्राम अंतर्गत जनजागृती केली.

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश परभनकर, जिल्हा पी. पी. एम समन्वयक श्री.जयकुमार सोनूने,पी.पी.एस एय जिल्हा समन्वयक डिगाबर महाजन,क्षेत्रकार्य आधिकारी प्रदिप पट्टेबहादुर,ओम साखरकर,तंबाखू नियंत्रण विभागा रामकृष्ण धाडवे, राम सरकटे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी चित्रकला व रांगोळी काढलेल्या स्पर्धेची पाहणी पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ भारती देशमुख,प्रमुख मार्गदर्शक डॉ. परभणकर,जयकुमार सोनुने, डिगाबर महाजन,रामकृष्ण धाडवे होते. उपस्थित मान्यवरांच्या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्र.रयत संजय कुटे,द्वितीय क्र.प्रथमेश संतोष पते, तृतीय क्र. प्रतीक रामदास सावके
प्रोत्साहनपर मनस्वी संजय कोंढाणे,शिवानी लक्ष्मण भुतकर
या विद्यार्थ्यांनी पटकाविला तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.वैष्णवी ज्ञानेश्वर पानझाडे, द्वितीय क्रमांक कु.मयुरी विष्णू काळे,तृतीय क्रमांक कु.सुनिता शंकर राजगुरू,प्रोत्साहनपर वैष्णवी काळे,साक्षी गिरी,गायत्री पद्मने,या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. परभणकर यांनी विद्यार्थ्यांना टी.बी विषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले.विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी समाधान लोणसुने,जिल्हा कार्यक्रम अधिकारी जयकुमार सोनुने, DPS – अशोक भगत, रामदास गवई अनंता कव्हर सेवा योजना कार्यक्रम अधिकारीप्रा.डॉ. मनीषा कीर्तने,प्रा.डॉ.जयश्री देशमुख, एन.सी.सी अधिकारी अमोल काळे, प्रा.डॉ.वसंत राठोड,प्रा.डॉ.प्रसेनजीत चिखलीकर,प्रा.डॉ रविंद्र पवार,नेहरु युवा केंद्रचे दत्ता मोहळे,कपिल देवकर, राजा प्रसेनजित संस्था प्रतिनिधी आकांक्षा गायकवाड, माधुरी गिरी,आकांक्षा कांबळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आकांक्षा गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप पट्टेबहादूर यांनी केली उपस्थित सर्वांचे आभार कु.वैष्णवी पानझाडे यांनी मानले. सदर कार्यक्रम हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश परभनकर, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचा आला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्षयरोग विभाग केंद्र,राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा,श्री.बाकलीवाल महाविद्यालय व श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.यावेळी सर्वांना टीबी मुक्त ची शपथ जयकुमार सोनुने दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close