क्राइम

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागचे खरे कारण आले समोर

Spread the love

बीड / नवप्रहार ब्युरो

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का करण्यात आली? याचं कारण सीआयडीने आज कोर्टात सांगितलं आहे.

अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड कोर्टात आज हजर करण्यात आलं. यावेळी सीआयडीने कोर्टात जवळपास 9 महत्त्वाचे मुद्दे मांडले. यातील महत्त्वाचा मुद्दा आता समोर आला आहे. अवदा कंपनीकडून खंडणी मिळवताना संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते. त्यामुळे त्यातूनच त्यांची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा मोठा दावा सीआयडीने कोर्टात केला.

संतोष देशमुख यांची नेमकी हत्या का झाली? ते आतापर्यंत स्पष्ट होत नव्हतं. सुदर्शन घुले याला 6 डिसेंबरला जी मारहाण झाली होती त्याचा बदला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या केली का? असा प्रस्न उपस्थित केला जात होता. मात्र, सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला आहे. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते त्यामुळे आरोपींनी त्यांची कट रचून हत्या केली, असं सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या का केली?

सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात मोठा दावा केला. वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली. पण कंपनीने दिली नाही. यावेळी संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला. एसआयटीच्या रिमांड रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी

या प्रकरणात अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनादेखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली होती. त्याच्या कार्यालयात बोलवून शिवाजी थोपटे यांना धमकी देण्यात आली होती.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close