योग विद्या धाम तर्फे प्राणायाम व आसन वर्ग
अहिल्यानगर / प्रतिनिधी
आपल्या फुफुसाची क्षमता व आपली प्रतिकार शक्ती वाढवून विविध विषाणूपासून होणा-या आजारापासून दूर राहण्यासाठी सोपी योगासने व प्राणायामचे वर्ग योग विद्या धाम दि.१५ जानेवारी पासून सुरु करत असल्याची माहिती योग विद्या धाम चे अध्यक्ष डाॅ सुंदर गोरे यांनी दिली.
HMPV नावाचा नवीन विषाणू सध्या आला आहे . या विषाणूमुळे श्वसनाचे त्रास होतात.
अशा परिस्थितीत फुफसाची व शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा अभ्यास फार उपयुक्त आहे.
अशी सोपी आसने व प्राणायाम शिकवणारे वर्ग दि. १५ जानेवारी पासून ऑफलाईन योग भवन, सावेडी येथे व १० जानेवारी पासून ऑनलाईन वर्ग सुरू होत आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या वर्गांचा लाभ घ्यावा असे आवाहन योग विद्या धाम चे वर्ग संचालक श्री अनिरुध्द भागवत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
फोन नंबर *0241 – 2421255*
व मोबा. *९४२३१ ६२४३८*
वर संपर्क साधावा.