क्राइम

धाड… धाड.. धाड … हॉटेल मध्ये पळापळ आणि तरुण रक्ताच्या थारोळ्यात 

Spread the love

भुसावळ / नवप्रहार ब्युरो

                    सकाळची वेळ.. थंडीचे दिवस अश्यात गरमागरम चाय मिळावी असे सर्वानाच वाटते. त्यामुळे अमरदिप टॉकीज जवळील एका हॉटेल मध्ये अनेक लोक चहा पित बसले होते. दरम्यान दोन बाईक वर चार तरुण हॉटेल जवळ आले. त्यांनी हॉटेल आमोर बाईक थांबवली . आपल्या प्रमाणे ते देखील ग्राहक असतील असे तेथील ग्राहकांना वाटले.पण हॉटेल मध्ये शिरताच त्यांनी त्याठिकाणी चहा पित बसलेल्या एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार करणे सुरू केले. त्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. आणि हॉटेल मध्ये धावपळ माजली. फायरिंग करून ते हवेत गोळीबार करत निघून गेले.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, तेहरीम नासिर शेख असे गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कोठे घडली घटना?

भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरुन आले. त्यांनी तोंडाला मफलर, स्कार्फ गुंडाळला होता. सकाळी थंडी असल्याने या तरुणांनी तोंडाला बांधले असावे असे इतरांना वाटले. सकाळी सात वाजेच्या सुमारास हाँटेलमध्ये गर्दी होती. त्याच गर्दीत हे चारही हल्लेखोर घुसले. अगदी सिनेस्टाईल त्यांनी या हाँटेलात एन्ट्री केली.

नेमकं काय घडलं?

या हाँटेलात तेहरीम नसिर शेख हा चहा पित बसला होता. हल्लेखोर एकामागे एक थेट त्याच्या जवळ गेले. त्यांनी खिशातील बंदूक काढून त्याच्यावर चार ते पाच राऊंड फायर केले. अगदी काही फुटांवरुन या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तेहरीम जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर एकच आवाज झाल्याने हाँटेलमधील इतर ग्राहक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी दहशत करण्यासाठी पिस्तूलमधून हवेतही गोळीबार केला.

काय होते कारण?

हल्लेखोरांनी अगदी जवळून तेहरीमची हत्या केली. या हत्येमागे पूर्व वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर मात्र परिसरात दहशत पसरली. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close