विशेष

38 वर्षीय व्यक्तीने जगाबद्दल केलेली भविष्यवाणी हादरवून सोडणारी

Spread the love

आता पर्यंतच्या त्याच्या भविष्यवाण्या ठरल्याय खऱ्या

                   प्रसिद्ध भविष्यकर्त्या बाबा वेंगा यांनी जगासाठी 2025 कसे असेल याची भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते हे वर्ष जगासाठी भयानक आणि विनाशक असेल असं म्हटलंय. आता एक 38 वर्षांचा व्यक्ती जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय. कारण याच्या आज पर्यंतचे भाकीत तंतोतंत खरं ठरलंय.

2018 मध्ये कोरोना अर्थात कोविडसारखा भीषण आजार येणार असून, त्यामध्ये लाखो लोक मरणार आहेत, असं त्यानेच पहिल्यांदा सांगितलं होतं. आता त्याच व्यक्तीने 2025 बद्दल जी भविष्यवाणी केली आहे ते ऐकून तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल.

एका रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा हिप्नोथेरपिस्ट निकोलस औजुलाने जगाबद्दल खतरनाक भविष्यवाणी केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, 2025 मध्ये तिसरं महायुद्ध होणं निश्चित आहे. हे एक असं वर्ष आहे जिथे जगात दयेचा अभाव असेल, धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांचा गळाही धरू शकतील, राजकीय हत्या होतील. वाईट गोष्टी आणि हिंसा पृथ्वीवर असेल. नवीन वर्षात लॅबमध्ये अवयवांची निर्मिती होईल, असा अंदाज निकोलस औजुला यांनी वर्तवला आहे.

अतिवृष्टी होईल, विनाशकारी पूर येईल. यामुळे लाखो घरांचे नुकसान होऊ शकतं, लाखो लोक बेघर होतील. समुद्राची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे अनेक शहरे पाण्याखाली जातील. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांना राजकीय पडझडीचा सामना करावा लागणार आहे. जगात महागाई झपाट्याने वाढेल. एवढेच नाही तर ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्यात समेट होईल, असेही भविष्य वर्तवण्यात आलं आहे.

काय-काय केली भविष्य वाणी ?

निकोलस औजुला असा दावा करतो की तो जेव्हा 17 वर्षांचा होता तेव्हापासून कोणीतरी त्याच्या स्वप्नात येतं आणि त्याला भविष्याबद्दल सांगितलं जातं. त्याने आतापर्यंत जी काही भविष्यवाणी केली आहे ती त्या स्वप्नावर आधारित आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण औजुला यांनी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या घटनांपैकी असलेल्या, ब्लॅक लाइव्ह्स मॅटर, डोनाल्ड ट्रम्पचा विजय, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वाढ, नोट्रेडेम फायर, कोविड, रोबोट आर्मी याबद्दल अचूक भाकीत केले होते. ते सर्व आत्तापर्यंत खरं ठरलं आहे.

कधी आला चर्चेत ?

निकोलसच्या सांगण्यनुसार, तो जेव्हा पौगंडावस्थेत होता तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडे अशी मानसिक क्षमता आहे. काही दिवस तो कोमात गेला. त्याला त्याच्या मागील जन्माची दृश्ये दिसू लागली.मला असे अनेक अनुभव आले, जे मला भविष्यवाणी करण्याची ताकद देतात,असे त्याने नमूद केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close