हटके

प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याची मुलाची होती तक्रार ,सत्य समजताच बापाच्या पायाखालची जमीन सरकली 

Spread the love

गांधीनगर / विशेष प्रतिनिधी             

                     आठवड्या भराच्या टूर नंतर वडील जेव्हा घरी परतले तेव्हा त्याच्या 4 वर्षाच्या मुलाने त्याच्या कडे त्याचे प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याची तक्रार केली. वडिलांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्याच्या लिंगाला पाने गुंडाळली होती. याबद्दल त्याने आपल्या पत्नीला विचारले असता तिने जे सांगितले ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने पोलिसात पत्नी विरोधात तक्रार दाखल केली.

राजकोटमधील राया टेलिफोननजीकच्या तुलसीपार्क परिसरात ही घटना घडली आहे. हिंदू तरुणाने पोलिसांना सांगितले गेले की, 2018 मध्ये त्याचे एका कट्टरपंथी तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. यानंतर दोघांनी विवाह केला. या विवाहानंतर त्यांना  4वर्षांचे अपत्य आहे.

21 डिसेंबर 2024 रोजी तो कामानिमित्त बाहेर गेला होता आणि आठवडाभरानंतर पुन्हा परतला. त्यानंतर त्याच्या मुलाने गुप्तांग दाखवत वेदना होत असल्याचे सांगितले. त्याने पाहिले तर मुलाच्या गुप्तांगावर पाने बांधण्यात आली होती. याप्रकरणी त्याने पत्नीला माहिती विचारली असता, तिने आपण आपल्या मुलाचा खतना केल्याची कबुली दिली आहे.

यानंतर हिंदू तरूणाने पोलिस ठाणे गाठत पत्नी रुक्सास आणि सासू या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाचा शोध घेत आहेत. याप्रकरणात अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही. यानंतर पतीच्या सासू सासऱ्याने खतना केल्याचे कबुल केले आहे.

दरम्यान, विवाहानंतर पतीचा धर्म लागू होतो असे हिंदू पतीने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पत्नीने केलेले कृत्ये हे परिपूर्ण चुकीचे असल्याचा दावा पतीने केला आहे. तसेच त्याने आपली पत्नी ही नेहमी शिवीगाळ करत होती, असे तक्रारीत दाखल केले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close