हटके

कॅनडाला जाण्यासाठी निघालेल्या पत्नीने प्रियकरा सोबत काढला पळ 

Spread the love

अकोला / विशेष प्रतिनिधी

                  विदेश जाण्यासाठी लोकं आसुकलेले असतात. काहीही करून एकदा विदेशात जावे अशी जवळपास सगळ्यांची ईच्छा असते. पण इच्छा ती शेवटी इच्छा . ही इच्छा सगळ्यांची पूर्ण होंगे असे नाही. परंतु काही भाग्यवान लोकांची इच्छा पूर्णत्वास जाते. पण एक असे प्रकरण उजेडात आले आहे की पती पत्नीला घेऊन कॅनडाला जाण्यासाठी निघाला होता. ते दोघे दिल्ली विमानतळावर आले. आणि नेमकी येघे संधी साधून पत्नीने प्रियकरासोबत पळ काढला.

             पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हरियाणातील एक दाम्पत्य ( दाम्पत्याची बदनामी होऊ नये या साठी त्यांचे  नाव गुपित ठेवण्यात येत आहे.) कॅनडाला जाण्यासाठी दिल्ली विमान तळावर आले होते. पत्नीला कॅनडाला जायचे नसल्याने तिने प्रियकराला बोलावून घेत दिल्ली विमानतळावरून पतीला गुंगारा देत पळ काढला. त्यानंतर दोघेही उज्जैन येथे दर्शनासाठी गेले. तेथून ते अकोल्यात आले. औंढा नागनाथ येथे जाण्याच्या तयारीत असताना रात्री अकोल्यातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले. दिल्ली पोलिसांनी प्रियकरासोबत पळ काढणाऱ्या विवाहितेचे मोबाइल लोकेशन तपासले असता दोघेही अकोल्यात असल्याची माहिती मिळाली.

पतीसोबत जायला तिचा नकार
दिल्ली पोलिसांनी अकोला गाठले. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांच्या सहकार्याने पत्नी व प्रियकराला १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पत्नीला पतीच्या स्वाधीन केले.
परंतु, पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत जाण्यास पसंती दिली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचे टाळले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दप्तरी नोंद केली नव्हती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close