इलिस्टा बेस्ट सिंगर अवॉर्ड’’ दिमाखदार सोहळा संपन्न
नगर – शहरात प्रथमच अशा अगळ्या वेगळ्या दिमाखदार सोहळयाचे आयोजन केले होते. फिल्मफेअर अवॉर्ड सारखा हा सोहळा रंगला…
नगर मधील विविध क्षेत्रात जसे वैदयकीय, अभियांत्रिकी, बैंकीग, शैक्षणिक, व्यापार, राजकीय क्षेत्रात कार्य करणारे पण गायनांचा छंद जोपासणारे गायक जे अनेक वर्षापासुन गायन कला क्षेत्रात आपले योगदान देत आहे. अशा गायकांना खास पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
पंचमदा फॅन्स फौडेशनचे गायक प्रा. संदिप भुसे, डॉ. सत्तार सयद, इंजिनिअर श्री. अजय दगडे, व्यावसायिक श्री. अभय कांकरीया, श्री, सारंग पधाडे, एस्तेर पवार, समीर खान, विद्या तन्वर, नेहा ओस्तवाल, राजू सावंत, पवन फिरोदिया, विकास खरात, किरण अजागरे यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्व गायकांनी आपली बहारदार गीते सादर केली डॉ सत्तार सयद यांनी गुलाबी आंखे, अभय कांकरीया यांनी कई बार युही देखा है, क्या खुब लगती हो, संदीप भुसे यांनी एक सनम चाहीए आशिकी के लिए, तु मिले दिल खिले, अजय दगडे यांनी चला जाता हु एस्तेर पवार यांनी तु तु है, वोहि सारंग पधाडे यांनी न जाने कोई कैसी है, विद्या तन्वर यांनी मुझको हुती ना खबर, असे दर्जेदार गीते सादर केली संदीप भुसे यांच्या मिमिकीने विशेष रंगत आणली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुबेर मार्केट, ब्लासम गिफ्ट बॉक्सेस, बिग एफ एम, इझी इलेक्टॉनिक्स, नगरी व्हिलेज, सायंतारा, बांगडीवाला युनीट्री, यांती विशेष मदत झाली तसेच श्री. कुबेर पतके यांनी विशेष परिश्रम घेतले.
–