राजकिय
उद्धव ठाकरेंना धक्का ; अनेक एसटी कामगारांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक / विशेष प्रतिनिधी
विधान सभेत मिळालेल्या अपयशातुन अद्याप उद्धव ठाकरे सावरायचे आहेत. अश्यातच त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. एसटी कामगार सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काल शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.
शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत
नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाझे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले. 40 आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरु आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!