क्राइम

जयंती नाल्यात मुंडके नसलेल्या धडाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश 

Spread the love

कोल्हापूर / नवप्रहार ब्युरो

                    जयंती नाला सफाई च्या वेळी गाळात सापडलेल्या मुंडके नसलेल्या धडाचे रहस्य शोधण्यात पोलिसांना आठ महिन्यानंतर यश आले आहे. छोट्याश्या वादानंतर झालेल्या भांडणाचे खुनात रूपांतर झाले होते. कुठलाही सबळ पुरावा नसताना तांत्रिक आधारावर आणि डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणीच्या आधारावर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.

कळंबा तलाव परिसरात खून झालेल्या अजय ऊर्फ रावण दगडू शिदे (डवरी वसाहत, यादवनगर) यानेच खुनाचा कट रचल्याचेही चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

कोणताही सबळ पुरावा नसताना किंबहुना केवळ तांत्रिक माहितीचा आधार व डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणी अहवालाच्या अभिप्रायावर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पथकाने खुनातील मारेकर्‍यांचा माग काढून बेड्या ठोकल्या आहेत. अभिषेक मंजुनाथ माळी (20), अतुल सुभाष शिंदे (23, रा. डवरी वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय 3 अल्पवयीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हुतात्मा पार्कमध्ये खून झालेली व्यक्ती शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील आहे. अशोक बाबूराव पाटील (45) असे त्यांचे नाव असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे, असेही पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथकाने तब्बल आठ महिने वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले. अखेर खून झालेल्या व्यक्तीसह मारेकर्‍याचा छडा लावण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.

खुनाचा पोलिस पथकाकडून समांतर तपास

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, शहरातील हुतात्मा पार्कजवळ असलेल्या जयंती नाल्याची जेसीबी मशिनद्वारे साफसफाई आणि गाळ काढताना एका पुरुषाचे डोके नसलेले आणि सडलेल्या अवस्थेतीत धड आढळून आले. पोलिस पथकांसह वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर 35 ते 40 वयोगटातील बेवारस व्यक्तीचे धड असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत तपास सुरू होता.

डॉक्टरांच्या अहवालानंतर तपासाची सूत्रे गतीने

उत्तरीय तपासणी अहवालामध्ये शार्प कट, असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा तपासाधिकार्‍यांचा प्राथमिक निष्कर्ष होता. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाधिकार्‍यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मारेकर्‍यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते. खून झालेल्या व्यक्तीचे नाव निष्पन्न न झाल्याने तपासात मोठा अडसर होता. मात्र अंगावरील कपड्यांवरून पथकाने शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील नातेवाईकांचा छडा लावला.

रावण शिंदे टोळीवर खुनाचा संशय

वेगवेगळ्या स्तरावर तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र मारेकर्‍यांचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार डवरी वसाहत येथील अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे याच्यासह साथीदाराच्या कृत्याची पोलिसांनी कुणकुण लागली.

धड सापडले त्याच दिवशी; म्होरक्याचा रंकाळ्यावर खून

पथकाने रावण शिंदे याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशीचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी मागमूस लागू दिला नाही. मात्र ज्या दिवशी जयंती नाल्यात धड मिळून आले, त्याच दिवशी म्हणजे 4 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी मुख्य संशयित रावण ऊर्फ अजय शिंदे याचा रंकाळा परिसरात खून झाला होता.

पोलिसी खाक्या दाखविताच संशयिताने तोंड उघडले!

पथकाने रावण शिंदे टोळीतील संशयित अतुल शिंदेसह अभिषेक शिंदे याला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच अतुल शिंदे याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. अतुल शिंदे म्हणाला, रावण ऊर्फ अजय शिंदे याच्या खुनापूर्वी 15 दिवस अगोदर अभिषेक शिंदे हा हुतात्मा पार्क येथे रात्रीच्या सुमारास बसला होता. काही अंतरावर अशोक पाटीलही कट्ट्यावर बसला होता. यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणातून वादावादी झाली.

एडक्याने खोलवर वार करून अशोक पाटीलला संपविले

अभिषेक शिंदे याने रावण ऊर्फ अजय शिंदे, अतुल जोशी, सुरज माळी, ओंकार माने यांना गार्डनमध्ये बोलावून घेतले. सर्व साथीदार आल्यानंतर त्यांनी अशोक पाटीलवर एडक्याने एका पाठोपाठ खोलवर वार केले. वर्मी हल्ल्यात अशोक पाटील ठार झाल्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे उतरविण्यात आले. एडक्याने त्याचे मुंडके तोडण्यात आले.

मुंडके गाळात पुरले तर धड नाल्यात फेकले : संशयिताची कबुली

मुंडके नसलेले धड जयंती नाल्यात फेकून देण्यात आले तर शिर काही अंतरावर नाल्याच्या कडेला गाळात पुरून टाकून पुरावा नष्ट करण्यात आल्याची संशयिताने कबुली दिली आहे, असेही पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close