पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीतर्फे शेतकऱ्याचा सन्मान करून शेतकरी दिवस साजरा
यवतमाळ / प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळ तर्फे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने शेतकऱ्याचा सन्मान करुन अहिल्यादेवी होळकर स्मारक यवतमाळ येथे शेतकरी दिन साजरा करण्यात आला.देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.चौधरी चरण सिंह यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल 2001 पासून हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो.संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजा अर्थात शेतकऱ्याला ओळखलं जातं.शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतात म्हणून आपण आपल्या घरात सुखाने चार घास खाऊ शकतो.भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील असून भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे.सहाजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा वाटा आहे.यावेळेस कोलूरा येथील शेतकरी पुंडलिकराव देवकते यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस अशोक भुतडा, विजय निवल,सुरेश भावेकर,पवन थोटे,मनोज पाचघरे आदी मान्यवर उपस्थित होते.