सामाजिक

आदिवासी बोली भाषेतून साहित्य निर्मिती होणे काळाची गरज* – प्रा. डॉ.संजय लोहकरे

Spread the love

यवतमाळ येथे नवोदित आदिवासी साहित्य परिषद संपन्न

(यवतमाळ)/ प्रतिनिधी

यवतमाळ येथे नुकतीच नवोदित आदिवासी साहित्य परिषद यवतमाळ येथे संपन्न झाली.साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय लोहकरे होते.डॉ.लोहकरे त्यांचे भाषणात म्हणाले की, आदिवासीं साहित्याचे लिखाण त्यांचे बोली भाषेतून झाल्यास आदिवासी संस्कृतिस आदिवासी समाज टिकेल,अन्यथा आदिवासींचे अस्तित्व नष्ट होईल. केवळ पुरस्कारासाठी लिहिलेले साहित्य आदिवासी साहित्य होऊ शकत नाही.असे ही ते म्हणाले,आदिवासीं साहित्य म्हणजे,आदिम अस्मिता अस्थित्वचा शब्दरूप आविष्कार म्हणजे आदिवासी साहित्य.नवीन पिढीने नविन दमाने, उत्साहाने समाजाच्या अस्तित्वासाठी साहित्य लिखाण केले पाहिजे,तरच आदिवासींचा इतिहासिक वारसा टिकणार आहे.असे त्यांनी सांगितले.उद्घघाटकीय भाषणात कवयित्री जसींता केरकेट्टा झारखंड म्हणाल्या. आदिवासीं संस्कृती ही मानवतावादी असून,पृथ्वीचे संरक्षण आदिवासींनी केले आहे.निसर्गच त्यांची संस्कृती आहे.पण आदिवासी हा उपेक्षी का?ही खंत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.उद्घघाटकिय सत्रात वक्ते म्हणून उपस्तीत असलेले प्रा. प्रब्रम्हनंद मडावी आणि प्रा.शीतल ढगे यांनी त्यांचे मनोगतात त्यांनी सांगितले, आदिवासींचया संविधानिक हक्कावर कसे आक्रमण होत आहे,त्यांचे आरक्षण चोरल्या जात आहे,विस्थlपण केल्या जात आहे.जल,जमीन, जांगलावरील अधिकार काढून घेतल्या जात आहे, साहित्य परिषदे मध्ये आदिवासीच्या ज्वलंत प्रश्नावर मौलिक चर्चा करण्यात आली. प्रमुख अतिथी बाळकृष्ण गेडाम,राजू मडावी,पैकूजी आत्राम,शंकर मडावी, डॉ.अरविंद कुळमेथे यांनी कविता सादर करून आदिवासींच्या राजकीय स्थितीचे वर्णन करतांना सांगितले,लोकशाही दारूच्या नशेत बुडत आहे,तिला वाचवायचे असेल तर उलगुलनाचा धागा बनले पाहिजे असे सांगितले.पहिल्या सत्रात प्रास्ताविक प्रा.वसंत कनाके यांनी मांडले,संचालन ॲड.अरविंद सिडाम यांनी केले तर आभार विद्या परचाके यांनी मानले. या साहित्य परिषदेत व्यंकटेश अत्राम साहित्यरत्न पुरस्कार प्रा.डॉ.संजय लोहकरे यांना प्रदान करण्यात आला. आणि मधुकरराव मडावी साहित्यभूषण पुरस्कार कवयित्री जसिंता केरकेट्टा झारखंड यांना प्रदान करण्यात आला.
दुसऱ्या सत्रा मध्ये “आदिवासी साहित्य,शिक्षण अस्मिता आणिअस्तित्व” या विषयांचे अणुसंगाने प्रा. डॉ.मनोहर मसराम तेलंगlणा,प्रा.गंगा गवळी नाशिक,प्रा.रामदास गिळंदे,यांचे सखोल मार्गदर्शन झाले.या सत्राचे प्रास्ताविक कविता किनाके यांनी मांडले, तर संचालन प्रा.नितीन टेकाम यांनी केले.आभार जयश्री मडावी यांनी मानले.या नवोदित आदिवासी साहित्य परिषद मध्ये अस्तित्वाचा उठाव रामचंद्र आत्राम, अंकुर प्रा.संगीता मसराम,आदिवासींच्या हक्कवरिल आक्रमणे प्रा.वसंत कनाके या ग्रंथाचे प्रकाशन झाले.तिसऱ्या सत्रात कवी संमेलन होते,अध्यक्ष डॉ.नीलकांत कुळसंगे तर उद्घाटक कुसुम अलाम ह्या होत्या. सहभाग कवी म्हणून सुरेश धनवे,डॉ.सतीश कोडापे, होमदेव कनाके,गणेश पेंदोर,लीलाधर आरमोरिकर,धनराज मेश्राम, दत्ता गावंडे,रजनीताई पोयाम, रावनदादा कुसरlम, भिमाल कनाके, सुमित आत्राम ,किरण मडावी,या सत्राचे संचालन रामचंद्र आत्राम तर आभार राम सिडाम यांनी मानले.या साहित्य परिषदेचे आयोजक म्हणून लीना बोरकर, विद्या परचाके,जयश्री मडावी,नंदा आत्राम,सचिन भादिकर, गौरव पंधरे,विलास कनाके,बाळकृष्ण गेडाम,राजेश ढगे,चिंतामण आत्राम, दत्ता गावंडे,ब्रम्हानंद मडावी,धनराज मेश्राम, पैकुजि आत्राम,श्रीराम कुमारे,रामचंद्र आत्राम, ॲड.अरविंद सीडाम,पुरुषोत्तम घोडाम,शंकर मडावी, तुषार आत्राम,राजू मडावी,वसंत कनाके, तारा कनाके, वैजंती पेंदोर, सुरज मरस्कोल्हे,उमेश येरमे,विनोद उईके,प्रमोद इरपाते, उमेश मडावी,शेखर कनाके,आदित्य ढोणे आदींचे सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close