आरोग्य व सौंदर्य

मोर्शी शहरामध्ये कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र मोहीम संपन्न

Spread the love

मोर्शी / प्रतिनिधी

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत शहरांमध्ये दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र मोहीम (कुसुम) माननीय वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत नियमित सर्वेक्षणात तपासणी न होणाऱ्या व्यक्ती म्हणजेच वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी, बांधकाम मजूर ,वीट भट्टी कामगार यांची तपासणी “कुसुम” मोहिमे अंतर्गत करण्यात आली. शहरांमध्ये शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह मधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येऊन कुष्ठरोग आजाराची सर्वसामान्य लक्षणे म्हणजेच फिकट किंवा लालसर चट्टा, तेलकट गुडगुडीत व चमकदार चेहरा, जाड कानाच्या पाड्या, हातापायाच्या बोटामध्ये मुंग्या येणे, बधिरता किंवा अशक्तपणा येणे तसेच आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येऊन तपासणी कुष्ठरोग तंत्रज्ञ गटलेवार मॅडम यांनी केली.
यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, वस्तीगृहाचे गृहपाल गोमासे मॅडम, लिपिक झांबरे तसेच वस्तीगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close