सामाजिक

खा. अमर काळे यांचे शिवसेना (उबाठा ) च्या वतीने मनस्वी स्वागत

Spread the love

ओंकार काळे / मोर्शी

मोर्शी मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर दादा काळे हे मोर्शी शहरातील तालुक्यातील जनतेचे विविध समस्या जाणून घेण्यासाठी आले असता, मोर्शी येथील विश्रामगृह येथे मोर्शी तालुका शिवसेनेतर्फ त्याचे पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण स्वागत करण्यात आले.तसेच रेल्वे विषयी समस्या आणि बडनेरा ते नरखेड ही रेल्वे गाडी नागपूरपर्यंत पुढे सुरू करण्याची आणि बंद झालेला हिवरखेड रेल्वे थांबा सुरु करण्याची मागणी करण्यात आली.तसेच अपघाताला कारणीभूत जुन्या बस स्टॉप समोरील रोडच्या टर्नवर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी स्वतः खासदार साहेबांनी दखल घेऊन कथलकर साहेबांना या दोन-चार दिवसात स्पीड बेकर लावण्याचे आदेश दिले.याप्रसंगी शिवसेना (उभाठा )चे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश चंद्रजी विटाळकर,ओंकार काळे, शहर प्रमुख शंकरराव मोरे, उप तालुकाप्रमुख नरेश भाऊ वानखडे, उमेश इखे त्याचबरोबर रेल्वे कामगार सेने तर्फे योगीराज पवार यांच्या नेतृत्वात रेल कामगार सेनेच्या समस्या तसेच विविध मागण्याकरिता निवेदन देण्यात आले ह्या प्रसंगी शिवसेनेचे शिवसैनिक व रेल्वे कामगार सेनेचे सदस्य शेखर कडू, योगेश गणोरकर,सुनील कुमार, गुड्डू कुमार,पप्पू पराते ई.मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close