कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा ऊपाध्यक्ष पदी श्री.विनायकराव पांडूरंग माने पाटील ,ऊमरखेड ह्यांची नियूक्ती
उमरखेड / प्रतिनिधी
समस्त कला प्रवर्गातील संघटीत आणि असंघटीत कला क्षेत्रातील कलावंत,वारकरी,भजन गायन मंडळी ह्यांचे कडून समाज प्रबोधनाचे दिशादर्शक कार्य अखंडीत सूरू राहावे, समाज मनात आपल्या आराध्य दैवतांचे ,संत व राष्ट्रीय महापूरूषांच्या आध्यात्मिक नैतीक,व पूरोगामी विचारांचे सिंचन अव्याहत सूरू रहावे,
कलावंत व वारकरी मंडळीची अस्मीता, मानसम्मान जपल्या जावा,शासनाच्या खांद्याला खांदा लावून शासनाच्या कल्याणकारी योजना गावखेड्यापर्यत पोहचवून गोरगरीबांना अधिकाधीक दिलासा मिळावा ह्या ऊदात्त हेतूने अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती चे कलावंत पदाधिकारी व कार्यकर्ते समर्पित भावनेनी कार्य करीत आहेत.
कलावंत क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे,कलावंताच्या प्रश्नाची जाण असणारे सूपरिचीत व्यक्तीमत्व श्री.विनायकराव पांडूरंग माने पाटील ह्यांची समितीच्या जिल्हा ऊपाध्यक्ष पदी नियूक्ती करून आज
दि.20 डिसेंबर 2024 रोजी समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड. श्याम खंडारे, ह्यांचे हस्ते व मा.सिध्दार्थ भवरे विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष ह्यांचे प्रमूख ऊपस्थिती मधे नियूक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या नियूक्तीचे मा.मनोहररावजी शहारे विदर्भ प्रमूख,जिल्हा अध्यक्ष अविनाश बनसोड,वारकरी कलावंत आघाडीचे जिल्हा प्रमूख मारोतराव ठेंगणे,ऊपाध्यक्ष गूणवंत लडके,महासचीव रमेश वाघमारे,संघटक अशोकराव ऊम्रतकर,ऊमरखेड तालूकाध्यक्ष मा.देवबन प्रयागबन गोस्वामी,पूसद तालूकाध्यक्ष मा. रणजीत शेजूळे,महागाव तालूकाध्यक्ष दत्ताभाऊ मदने महाराज तथा समस्त तालूका अध्यक्ष, महीला तालूका आघाडी प्रमूख ई नी अभिनंदन केले आहे.