अपघात

एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाली ; 5 ते 7 लोक बेपत्ता

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

                आर्थिक राजधानी मुंबाईतील एलिफंटा परिसरात हरक प्रवाशी बोट बुडल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. गेटवे ऑफ इंडिया वरून एलिफंटा जाणाऱ्या या प्रवाशी बोटीला एक स्पीड बोट धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

 या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्या बोटीवर अंदाजे 30 ते 35 लोक होते. त्यापैकी 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की, 5 ते 7 लोक अजूनही बेपत्ता आहेत. मी शोध घेईन. मला सविस्तर माहिती मिळताच दुपारी 3.15 वाजता बोट एलिफंटाकडे रवाना झाली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे.

रोहित पवारांकडून चौकशीचा मागणी

एलिफंटाकडे जाणारी बोट उलटून काही प्रवाशी बेपत्ता असल्याचं वृत्त धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि बेपत्ता असलेले प्रवाशी सुखरूप परतावेत, ही प्रार्थना.. पण ही दुर्घटना का घडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशी घटना पुन्हा घडू नये आणि पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याकडे सरकारने आवश्यक लक्ष द्यावं, ही विनंती, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close