धक्कादायक ….. आमदारांच्या मामाचे अपहरण करून हत्या

पुणे / नवप्रहार डेस्क
मागील काही काळापासून क्राईम चे शहर अशी ओळख होत चाललेल्या पुणे शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक वरून परतत असताना ही घटना घडली आहे.12 तासानंतर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. जेथे आमदारांचे नातेवाईकच सुरक्षित नाही तेथे आपले काय ? अशी चर्चा जनतेत रंगू लागली आहे.
या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. अपहरणानंतर सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ याने घडलेला सर्व प्रसंग सांगितला.
मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर सतीश वाघ यांना त्यांच्या मित्राने अखेरच पाहिल्याचे मुलाने सांगितले. सतिश वाघ यांचे त्यांच्या मित्राशी बोलणे केले त्याला हात केला. पप्पा पुढे गेले आणि त्यांचे मित्र घराकडे आला. पप्पांच्या मित्रांना आवाज आला त्यांनी मागे वळून पाहिले तर ती गाडी त्यांना पुढे घेऊन गेली होती,अशी माहिती हत्या झालेल्या सतिश वाघ यांच्या मुलाने सांगितली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात
सतिश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकरांचे मामा आहेत.
पहाटे साडे सहा वाजता सतीश वाघ यांचं अपहरण झाले. ओळखीच्या प्रत्यक्षदर्शीने घटनेची सातच्या सुमारास माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईक , स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांना साडेसात वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली. हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला .
12 तासात पोलीसांच्या हाती काही लागले नाही
साधारण साडे आठ वाजता गुन्हे शाखेला 9 वाजता टीम रवाना करण्याचे आदेश दिले.साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या 12 टीम्स ने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने 12 वाजता तपास सुरू केला. तीनच्या सुमारास पोलिस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले.
उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडला
दरम्यान शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली . हडपसर पोलिस , गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी हा मृतदेह सतीश वाघ यांचा असल्याची खात्री पटली.
मांजरी – फुरसुंगी रस्त्यावर हॉटेल आणि दुकाने भाड्याने
सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. सतीश वाघ हे शेतकरी आहेत . त्यांची मांजरी – फुरसुंगी रस्त्यावर हॉटेल आणि दुकाने भाड्याने होती. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते किंवा भांडणे नव्हती