पेरियार आणि कांशीरामजीची चळवळ बुद्ध, फुले, आंबेडकरांचीच चळवळ आहे” एडवोकेट,डॉक्टर सुरेश माने
यवतमाळ / प्रतिनिधी
महामानवांनी त्या त्या काळात सामाजिक, वैचारिक क्रांती केलेली आहे ते त्यांच्या पद्धतीने. मग ते चार्वाक असो कबीर असो गुरु रविदास, गुरुनानक, पेरियर रामास्वामी किंवा बुद्ध . .महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना लोकशाही प्रगल्भतेची धार दिली काशीरामजींनी. तोच पाया पेरियार रामास्वामींचाही होता. हिंदू धर्माला आव्हान करणारे अनेक प्रश्न पेरियर यांनी जनतेत उभे केले आणि दक्षिणेतील जनता त्याच विचारांना अभिप्रेत करून राजकीय संघर्षात उभी ठाकली ,आपल्या हक्कांसाठी लढली म्हणून आज तिथे 50% रिझर्वेशन ओबीसींना आहे .स्मृती पर्व 2024 महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नऊ दिवसांचा वैचारिक परिवर्तनवादी उपक्रमातील उपक्रमातील दिनांक पाच डिसेंबर 2024 च्या स्मृती पर्व महिला समितीतर्फे महिलांनी आयोजित या कार्यक्रमात माननीय डॉक्टर सुरेश माने अभ्यासक विचारवंत आणि कायदे तज्ञ यांनी आपले विचार मांडले. त्यांचा विषय होता फुले शाहू आंबेडकर विचारधारा राजकीय क्षेत्रात यशस्वी करण्यामागे पेरियर आणि कांशीरामजी यांची भूमिका व संघर्ष. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील दलित जे आज बौद्ध म्हणतात त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारल्यामुळे वैचारिक क्रांती सामाजिक आणि राजकीय पक्ष त्या त्या नावाने काम करतात परंतु ओबीसींना मात्र त्यांचा स्वतःचा पक्ष नाही, विचार नाही ते सगळयाच पक्षात विखुरले आहेत कारण या समाजात महान , सामाजिक क्रांतीकारकांचे विचार त्यांच्यापर्यंत पाहिजे तसे पोहोचले , पेरियार यांनी जातीव्यवस्थेला आव्हान देऊन क्रांती केली तर कांशीरामजींनी त्याच अल्पसंख्य जातींना एकत्र करून त्याच जात समूहासोबत” जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी ”हे गणित मांडले. जात अशी की जात नाही असे असेल तर जातीतच आम्हाला लोकशाहीचे अधिकार हवेत. त्यासाठी आपण लढूया जातीला एकत्र करून, हे गणित मांडले काशीरामजींनी आणि यशस्वी केले उत्तर प्रदेश मध्ये. भारतीय रिपब्लिक पक्ष महाराष्ट्रात असताना कांशीरामजीना बीएसपी ही बाबासाहेबांच्या विचारांची नवीन पार्टी काढावी लागली, का ??या प्रश्नावर उत्तर देताना डॉक्टर सुरेश माने म्हणाले की त्यांनी खूप वर्षे महाराष्ट्रात आरपीआयला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पण राजकीय दृष्ट्या जेव्हा बाबासाहेबांची उभी असलेली, कार्यरत असणारी संघटना व पक्ष एवढी मजबूत असतानाही राजकारण करताना मजबूर होते तेव्हा महाराष्ट्रात आरपीआय ला सोडून त्यांना हेच स्वप्न नव्याने देशात बीएसपी तर्फे उभे करावे लागले, यशस्वी केली. महात्मा फुलेंनी धार्मिक गुलामगिरी नाकारली, बाबासाहेबांनी मानव मुक्तीचा नवा धर्म दिला, पेरियार रामास्वामिनी धर्माला आव्हान दिले तर काशीरामजींनी दुबळ्यांना हक्काच्या लढाईचे साधन दिले ,ही लढाई अविरत कबीरांनी लढली, रविदासांनी लढली ,संत तुकारामाने लढली ,गाडगेबाबा सुद्धा त्याच लढाईत होते. शाहू महाराजांनी ओबीसीसाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी दक्षिणेत संघटना उभी केली होती त्या सभेला ते नेहमी हजर असायचे .ही अशी सोन्याहून बहुमोल असणारी ही माणसे समाज परिवर्तनाचे पाईक आहेत असे म मोलाचे विचार माननीय डॉक्टर सुरेश माने यांनी स्मृती पर्वात व्यक्त केले. त्या स्मृती पर्वातील महिलांच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मान्यवर वनमाला ताई राऊत होत्या. प्रास्ताविक वंदना गडलिंग यांनी मांडले. सूत्रसंचालन जया तेलंग यांनी केलं तर आभार संतोषी लोटे यांनी केले .सुगम संगीताची जबाबदारी वर्षाताई खडसे आणि जया तेलग ह्यांनी सांभाळली या कार्यक्रमाचे आयोजक होते डॉ. सुनंदा वालदे, सिंधुताई धवणे, कुंदा बोरकर, शीलाताई सरदार सुनीता काळे ,वंदना कांबळे कुसुम देवताळे, मायाताई भगत वनमाला ताई कापशीकर, स्मिता नागदिवे लता कटके, शालिनी शेजुळे, भाग्यश्री ढोणे ,अर्चना पाटील करुणा खैरे या होत्या तर या कबीर विचार मंचावर उपस्थित मान्यवर इंजिनीयर रीना पानतावणे ,डॉ तक्षशिला मोटघरे ,डॉ रजनी कांबळे, डॉ रश्मी तामगाडगे, डॉ माधुरी जनबंधू ,नंदा वाकोडे सुशीला पाटील शोभना कोटंबे शीलाताई सरदार रंजना ताक सांडे ,वंदना कांबळे उपस्थित होत्या