सामाजिक
महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे डॉ.आंबेडकरांना अभिवादन..
वंचित बहुजन आघाडीची डॉ.आंबेडकरांना विनम्र श्रद्धांजली…
यवतमाळ / प्रतिनिधी
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांचे उपस्थितीत जिल्हा, तालुका, शहर, महिला, आणि युवा आघाडीच्या वतीने संविधान चौक यवतमाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.नीरज वाघमारे-जिल्हाध्यक्ष यवतमाळ, शिवदास कांबळे- जिल्हा महासचिव, धम्मवतीताई वासनिक- अध्यक्षा महिला आघाडी, गजानन सावळे- शहराध्यक्ष, प्रमोद पाटील- शहर महासचिव, प्रसेनजीत भवरे- शहर कार्याध्यक्ष, रत्नमाला कांबळे- महिला महासचिव, विलास वाघमारे- शहर उपाध्यक्ष, भारती ताई सावते-सचिव, संध्याताई काळे-उपाध्यक्ष, शीलाताई वैद्य, करुणाताई चौधरी, शैलेश भानवे, दीपक नगराळे, सिद्धार्थ भवरे, गजानन कोकाटे, उत्तम कांबळे, अशोक मनवर, गुणाजी मानकर, राजकुमार उमरे, आनंद भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1