या कारणाने RSS भाजपावर आहे नाराज

मुंबई / नवप्रहार डेस्क
महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे RSS ची खूप मोठी भूमिका असल्याचे उघड झाले आहे. RSS ने अन्य राज्यातून स्वयंसेवक बोलावून महाराष्ट्रात डोअर टू डोअर प्रचार केला होता. त्यामुळेच ‘ वोट जिहाद ‘ च्या विपरीत परिस्थिती नंतर ही भाजपा ला नेत्रदीपक यश मिळाले आहे. ईतक्या मोठ्या यशा नंतर ही भाजपा ने अद्याप गट नेता निवडला नाही. तसेच मुख्यमंत्री पदाचे नाव देखील जाहीर केले नाही. सगळे आलबेल असतांना भाजपा कडून गुप्तता पाळण्यात येत आहे। यामुळेच संघ भाजपा नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू असताना दरम्यानच्या काळातील राजकीय घडामोडींवरून उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यामुळेच संघ भाजपवर खप्पामर्जी असल्याची चर्चा आहे.
बहुमत असताना मुख्यमंत्री जाहीर करण्यात भाजपकडून उशीर होत आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाविषयी भाजप एवढी गुप्तता का पाळत आहे, असा सवालही संघाकडून विचारला जात आहे. एवढे प्रचंड बहुमत असताना महायुतीने सरकार स्थापनेचा घोळ का घातला? त्यामुळे मुख्यमंत्रिपदाविषयी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु झाली, असे संघातल्या वर्तुळात बोलले जाते.
शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली. महायुतीच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरलाय. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल आठवड्याभरानं सरकार स्थापनेची तारीख जाहीर करण्यात आली. पण दरम्यानच्या काळात बरचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं.त्यामागची कारणेही तशीच आहेत. विधानसभेत भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. २८८ पैकी १३२ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. बहुमताच्या आकड्या जवळ जाणारं संख्याबळ असतानाही भाजपकडून सत्तास्थापनेला एवढा वेळ का लागला? यावरून भाजपची मातृसंस्था आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचं बोललं जातंय. या नाराजीमागचं कारण म्हणजे
विधानसभेत मोठं संख्याबळ असतानाही भाजपनं अद्याप विधानसभा गट नेत्याची निवड केली नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला देणार याविषयी उलगडा केला नाही. त्यामुळे गेली आठवडाभर संभाव्य मुख्यमंत्र्यावरून राजकीय वर्तुळात अनेक अडाखे बांधण्यात आले. जातीय समीकरणांच्या आधारावर भाजप मुख्यमंत्री ठरवणार असल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. आणि हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीचं मुख्य कारण असल्याचं बोललं जातंय..
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महत्वाचं भूमिका बजावली आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्या जिल्ह्यात संघाचे कार्यकर्ते सक्रीय होते. संघाच्या मेहनतीमुळेच भाजपला मोठा विजय मिळवता आला, असे बोलले जाते पण त्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार याविषयी गुप्तता पाळली जात आहे. त्यावरून विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली. मुख्यमंत्रिपदाच्या नावाची गुप्तता पाळल्याने आणि निर्णय घ्यायला विलंब लावल्याने भाजपचा वेळखावूपणा संघाला रुचला नाही.