श्री विवेकानंद कन्या विद्यालय पं. जवाहरलाल नेहरु यांची जयंती उत्साहात साजरी
मोर्शी / ओंकार काळे
नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालया मध्ये 14 नोव्हें. स्वतंत्र भारतचे पहिले पंतप्रधान ‘ मुलांचे चाचा ‘ पं. जवाहरलाल नेहरुजींची जयंती मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर शिक्षक श्री. वाय.जे. तट्टे सर ,श्री पी.बी. आडे सर , कु. तनुजा पोटे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला*
*स्वातंत्र्य चळवळीतील महान नेतृत्व ‘ वैज्ञानिक दृष्टीकोन ‘ आधुनिक करणाचा ध्यास ,भारताचे स्वत्व निर्माण करण्याची जिद्द आणि ‘न भूतो न भविष्यति ‘ अशी लोकप्रियता असणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी आपल्या जीवनांत पाश्च्यात्य आणि पौर्वात्य संस्कृतीतील उत्तमोत्तम गोष्टींचा संगम साधला.म. गांधीजींच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक पं. जवाहरलाल नेहरु हे लोकशाही आणि समाजवादाचे पुरस्कर्ते होते. लहान मुलांवर नितांत प्रेम करणारे होते. त्यांच्याकरिता शिक्षणाची प्रणाली देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवली. म. ग