जितेंद्र मोघे प्रचारार्थ नाना पटोलेची सभा घाटंजीत.
सभेला लाडली बहणाची मोजकी उपस्थिति*
*मंचकावरून भाजपा वर टिका शस्त्र*
घाटंजी ता प्रतिनिधि-सचिन कर्णेवार
दि. 13/11/2024 रोजी दूपारी 2 वाजता घाटंजी येथिल पंजाबी लॉन चे बाजुला खूल्या प्रांगणात आर्णि 80 विधानसभा क्षेत्रात उभे असलेले कॉग्रेस चे उमेदवार जितेंद्र शिवाजीराव मोघे यांच्या प्रचारार्थ कॉग्रेस चे अनेक दिगज नेते व कॉग्रेस मित्र पक्ष नेते एकत्रित आले. सभा अध्यक्ष स्थानी कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, तर प्रमुख पाहूणे म्हणून वजाहत मिर्झा,अॅड शिवाजीराव मोघे,सुधिर मुनगिनवार, प्रवित्र देशमुख, उमेदवार जितेंद्र मोघे,व ईतर ही मित्र पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सूरवात महामानव व संत वंदनेत करण्यात आली.तसेच आता
महाविकास आघाडी आली त आश्वासन नाही कामे होतील म्हणत आर्णि विधानसभा क्षेत्रात उभे ठाकलेले उमेदवार जितेंद्र मोघे यांनी कार्यक्रम आगाज केला. सध्या माझे प्रतिस्पर्धी हे घूमून फिरुन सर्व दरवाजे खटखटत आलेले आहे. तिकीट मिळण्याआधी पक्षातील श्रेष्ठींना शिव्या शाप देणारे आता त्यांची स्तूती करत आहे अशा दूतोंडीला आपण सतेत बसणार का? असा प्रश्न ही उपस्थित जनतेत केला. भाजपा हे निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन फसव्या योजना आणतात असही ते म्हणाले. तदनंतर किशोर तिवारी यांनी मंचकावर येत संभाषण साधत प्रत्येकाला एकच गोष्ट हवी कापसाची खरेदी केली जात नाही. ईथ त तूर, कापूस महाग त झाला नाही पण,बाहेरुन आयात करुन भाव पाडले. सर्व अडाणी अंबानी चे सरकार आहे. मोदी फोकट आश्वासन देणारा नेता. म्हणत ईथ मंचकावरुन सांगतो यवतमाल जिल्हा भाजप मुक्त होईल हे नक्की.मागे पंधरा से न पडणारे मोघे चे सुपूत्र दिड लाख मतान येतील हे जनतेनी ठरवल. माजी आमदार धूर्वे न काम कमी केले व ठेकेदार पासून वसूली केली हे पष्ट केले.राजू तोडसाम तेलंगाना त गेले, पुर्वी जयंतराव कडे गेले व विनंती केली. तिकीट मिळण्या आधी देवेद्र फडणवीस, मोदी ला पण शिवी आता सत्तेत हात मिळवला तिकीट पॅकेज न मिळाली त त्यांची स्तूती चालू केली. भाजपात घेऊन घेतात व नंतर वांदे करतात म्हणत हास्याची फीरकी केली. स्थानिक वाघा डी नदी स्वच्छतेत 120 कोटी गायप पण वाघाडी तसिच. कॉग्रेस गेल अन खराब टरफल आल.हा उल्लेख केला. मंचकावर बोलताना बाळासाहेब मुनगिनवार- दरभद्री सरकार ला पाडण्यासाठी जितेद्र मोघे सारखा सुसंस्कृत उमेदवार हवा. भाजपात डाबडूबली खेळ चावलते 10 वर्ष आधि धूर्वेला तिकीट ती कापुन तोडसामला परत धूर्वे आता परत तोडसाम हा डाबडूबली खेळ चालवला आहे. सभेला मात्र महिला वर्गाची उपस्थिति मोजकीच दिसून आली.शिवाजीराव मोघे- मंचकावर बोलताना जातपात पलिकडे कॉग्रेस सांगत ईंदीरा गांधी म्हणत होत्या जात पर न पात पर मोहर लगा ओ हात पर!. म्हणत गर्जना दीदी. यवतमाळ जिल्हा सात पैकी पाच ठीकाणी कॉग्रेस लढत आहे. तो विजयात परावर्तित होईल असही ते म्हणाले.संचालक निवेदक राऊत यांनी ‘असत्याचा अंधकार चोहीकडे गाजला त्यासी विझवण्यास सूर्य आम्हा भेट ला.’ म्हणत नाना पटोले यांना मंचकावर बोलावले तेव्हा उपस्थित कार्यकर्ते अबकी बार कॉग्रेस सरकार म्हणत गर्जना केली. पटोले आपल्या संभाषण भाजपावर निशाना साधत
भाजपाची सवय लोकशाही थट्टा करणे आहे. जनतेला गुलाम समजण्याची माणसिकता भाजपाची.वणितील ओबीसी आयोगा अध्यक्ष हंसराज भैया समोर कुणबी समिजास अपशब्द पण, अपशब्द उचारणा-यास समर्थन. बहूजणाचा अपमान सहन करणार नाही. व्यापारी डाव सरकार कापसाला 12 हजार रु भाव देऊ ही आमची भुमिका. मतदान एक दिवसाची मजा नाही चूकीचा उमेदवार आला त पाच वर्ष सजा आहे. भ्रष्टाचार करणा-याले सत्तेत गेल की, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पद भेटत !ही भाजपाची वृत्ति. म्हणत भाजपा कार्याचा पाढा वाचला.सभेला घाटंजी सह तालुक्यातील आजी, माजी, यूवक पदाधिकारी बहूसंखेनी उपस्थित होती. पोलिस यंत्रणांनी गोधळ होणार नाही यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.