भारतातील असे गाव ज्या ठिकणी परदेशी महिला येतात गर्भवती होण्यासाठी
लडाख / विशेष प्रतिनिशी
नैसर्गिक सुंदरतेने नटलेला आणि हिमवृष्टी साठी ओळखल्या जाणाऱ्या लडाख मध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येतात. यात परदेशी पर्यटक देखील असतात. पण तुम्हाला हे माहीत आहे काय की लडाख मध्ये असलेल्या एका गावचे वैशिष्ट्य असे आहे की या गावात विदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात.
लडाखमध्ये कारगिलपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.या गावाचं नाव आर्य व्हॅली असं आहे. या गावाबाबत असा दावा केला जातो की या गावात परदेशी विशेषकरून युरोपियन देशातील महिला या फक्त प्रेग्नेंट होण्यासाठी येतात. त्यांची इच्छा असते की या गावात राहणाऱ्या पुरुषांचं मुलं आपल्या पोटी जन्माला यावं.ऐकायला हे थोडं विचित्र वाटत असलं तरी येथे कायम परदेशी महिलांची गर्दी असते. याला कारण म्हणजे यामागे असलेला एक समज आहे.
गर्भ धारणेसाठी का येतात महिला?
लडाखमध्ये असलेल्या या आर्य व्हॅली गावात ब्रोकपा जमातीचे लोक राहतात. या लोकांबाबत बोलताना असं म्हटलं जातं की हे ब्रोकपा जमातीचे लोकं अलेक्झांडर द ग्रेट अर्थात सिकंदरच्या सैन्याचे वंशज आहेत. एवढंच नाही तर असा दावा देखील केला जातो की या जमातीतील नागरिक जगातील शेवटचे शुद्ध आर्य आहेत. सिकंदर जेव्हा भारतात आला होता, तेव्हा तो आपल्यासोबत प्रचंड सैन्य घेऊन आला होता, मात्र त्याच्या सौन्यातील काही लोक हे भारतातच राहिले या सैन्याचे वंशज म्हणजेच ही ब्रोकपा जमात आहे, असं मानलं जातं.
युरोपीयन देशातील अनेक महिलांची अशी इच्छा असते की आपल्या पोटी जन्माला येणारं मुलं हे शुद्ध आर्य वंशातील उंचेपुरे आणि सशक्त असावं, त्यामुळे या महिला केवळ गर्भ धारणेसाठी या गावात येतात. प्रेग्नेंन्सी नंतर या महिला पुन्हा आपल्या देशात परत जातात. सुरुवातीला या लोकांबद्दल फार थोड्या युरोपीयन महिलांना माहिती होती. मात्र त्यानंतर सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या वापरामुळे या जमातीची माहिती या महिलांना सहज उपलब्ध झाली, आणि येथे येणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढली. या महिला आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी या लोकांना पैसे देतात.
ब्रोकपा जमातीच्या लोकांकडून देखील ते शुद्ध आर्य असल्याचा दावा करण्यात येतो, मात्र याबाबत अद्याप कुठलाही अधिकृत पुरावा समोर आलेला नाहीये. मात्र त्यांची शरीराची ठेवण आणि उंची तसेच जुन्या कथांनुसार ते शुद्ध आर्य असल्याचा दावा केला जातो.