हटके

मिरवणुकीतील हत्तीने कार उचलून धडाधडा आपटली

Spread the love

बिहार / नवप्रहार डेस्क 

            हत्ती हा खूप शक्तिशाली प्राणी आहे. आणि शांत देखील आहे. पण एकदा जर तो संतापला तर मग त्याला शांत करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अनेक वेळा हत्तीने महावताला पायाखाली चिरडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हत्ती शांत प्राणी असल्याने अनेक मंदिरात हत्ती पाळले जातात. अनेक धार्मिक कार्यक्रमात देखील त्यांना सहभागी केल्या जाते. एका मिरवणुकीत हत्ती ला सहभागी केल्या गेले होते. या हत्तीने रस्त्यावर उभ्या असलेल्या कार ला धडाधडा आपटने सुरु केले. घटना बिहार राज्यातील आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका रस्त्यावर मिरवणुकीनिमित्ताने नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या मिरवणुकीत एक हत्ती आहे मात्र पुढे पाहिले तर दिसेल की नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने हत्ती धुमाकूळ घालण्यास सुरुवात करतो. त्यानंतर रस्त्यावर असलेली वाहने हत्ती खेळण्यातील वस्तू सारखी त्याच्या सोंडेने सर्वत्र फेकताना दिसून येत आहे. सर्व घटना तेथील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

सर्व घटना बिहारमधील असून घटनेचा व्हिडिओ ”इन्स्टाग्रामवरील” ”@studentscolours” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानंतर कॅप्शनमध्ये,” बिहारमधील छपरा येथे शनिवारी दसरा मिरवणुकीत एका हत्तीचा ताबा सुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हत्तीने धिंगाणा घातला आणि बाजार परिसरात सुमारे दोन तास गोंधळ घातला आणि या प्रक्रियेत अनेक गाड्यांचे नुकसान केले.हत्तीने बसचे नुकसान केल्याचे व्हिडिओही आता समोर आले आहेत. या फुटेजमध्ये बाजारात मोठा हत्ती असून त्याच्या पाठीवर तीन लोक दिसत आहेत”, असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close