कृषी कन्याची शेतकर्यांशी शूष्म पौषक तत्वावरील घटका शेतीविषया बाबत केली चर्चा
बाळासाहेब नेरकर
स्थानिक जळगाव जामोद येथील स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तालुक्यातील उटी येथे सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेवर उपाययोजनांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती .
पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी नत्र , स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते मात्र अत्यंत कमी प्रमाणात लागणाऱ्या इतर मूलद्रव्यं विषयी शेतकऱ्यांमध्ये फारशी जागृती नाही. लोह, जस्त ,तांबे मंगळ , निकेल, क्लोरीन , इत्यादी अशी एकूण आठ मूलद्रव्ये आहेत .त्यांच्या उपयोग वनस्पतीमध्ये उत्प्रेरक निर्मितीचे कार्य ,हरितद्रव्य निर्मिती फुल व फळधारणेय मदत आणि प्रथिने तयार करण्यात होतो याबद्दल सखोल मार्गदर्शन केले .
हा कार्यक्रम प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे , प्रा.विद्या कपले आणि विषय तज्ञ प्राचार्य समाधान काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पूर्वा डोबे , प्रियंका हिस्सल , ऋतुजा पाटील , प्राजक्ता इंगळे , प्रीती डवले कल्याणी खारोडे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला .