आध्यात्मिक

कारला येथे 35 वर्षापासून काकड आरतीची परंपरा आजही चालू

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

.. विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा… हरि गुण गाऊ चला,चला हो… हरी गुन गाऊ चला तुकड्यादास म्हणे याना आपुले परके विसरून जाना… भारतीय संस्कृती जपत कार्तिक महिन्यात गेल्या 35 वर्षापासून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला गावामध्ये बालगोपाल भजन मंडळ कारलाव्हयंचे वतीने काकड आरतीची परंपरा अखंड चालू आहे. गावातून पहाटे प्रदक्षिणा घेत सर्व मंदिरात जाऊन काकड आरतीचे अभंग व आपल्या लाडक्या विठुरायाचे गुणगान गाणे हीं भजन मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात सर्व बालगोपालच आढळतात. गेल्या 35 वर्षापासून कृष्ण मंदिर कारला येथून पहाटे काकड आरतीची सुरुवात होते. गावातील प्रदक्षिणेच्या वेळेस गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते. तसेच या बालगोपालांना आपल्या संस्कृतीची जाणीव टिकून राहुन त्यांना आयुष्यात चांगल्या सवयी लागतात. काकड आरती मध्ये अरुण भाऊ ढोकणे, शेषराव दाते, संदीप लोणकर, अशोक वानखडे, प्रवीण ढोकणे, अनिल लोणकर, शाम राऊत, शिवम उगले, श्रीकृष्ण मोडोकार, प्रदीप लोनाग्रे, सुभाष दाळू, संतोष काळे, नागेश डाबेराव, गजानन मानकर, अथर्व मानकर, जयंत बाळू, नरेंद्र सातव, कृतिक वानखडे, दादाराव दाळू, रमेश दाळू, बाळू पारखे इतरही गावकरी बालगोपालांची उपस्थिती नित्यनेमाने असते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close