राजकिय

सरवणकर यांची माघार नाहीच ; लढत हायहोल्टेज होणार

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                    महायुती ‘ राजपुत्राला ‘ मदत करण्याचा मनस्थितीत असताना शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांनी अनेक नाटक केल्यानंतरही माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे माहीम मतदार संघात हायहोल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे.त्यानंतर आता मनसेचे उमेदवार व पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही सरवणकरांना ललकारले आहे.

भाजपने या निवडणुकीत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र, सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने माहिममध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमित ठाकरे यांनी यापूर्वी सरवणकरांबाबत बोलणे टाळले होते. पण शुक्रवारी ट्विट करत त्यांनी सरवणकरांचा समाचार घेतला. माहीम विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेल्या विद्यमान आमदारांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूकच केली. प्रत्येक वचने हवेत विरली, आणि जनता मात्र फसवली गेली, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

आता हा लढा मी थेट तुमच्या हक्कांसाठी लढणार आहे. मायबाप जनतेचा आशीर्वाद पाठीशी आहे. आता खरंच बदल होणार, आता न्याय मिळणार, असे मतदारांना उद्देशून अमित ठाकरे म्हणाले आहेत.

दहा वर्षे तुम्ही सत्तेत होता. आजचं दादर माहिम पाहिल्यानंतर मला निवडणुकीत उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही ठणकावून सांगत अमित ठाकरे यांनीही सरवणकरांना जणू ललकारले आहे. ठाकरेंनी आपली भूमिका आता स्पष्ट केल्याने ही लढत काँटे की टक्कर होणार असल्याचे दिसते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close