लाहोटी महाविद्यालयात तील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची बँकेला भेट:
बँकेतील कामकाजाची घेतली माहिती
मोर्शी /ओंकार काळे
बँक खाते कसे सुरू करायचे,बँकेचे कामकाज कसे करतात तसेच बँकिंग खात्यांचे प्रकार, चेक बँकिंगचे मूलभूत ज्ञान, नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बँकेला भेट देऊन कामकाजाबाबत ची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांसाठी आर्थिक शिक्षण हा विषय वाणिज्य शाखेला अभ्यासक्रमात असून कार्यात्मक दृष्टिकोन अवलंबून विकसित करण्यात आला आहे. मूलभूत आर्थिक संकल्पना समजून घेणे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करणे ही आर्थिक शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेच्या पातळीवर, त्यांच्या जीवनातील पैशाची भूमिका, बचतीची गरज आणि वापर, औपचारिक आर्थिक क्षेत्र वापरण्याचे फायदे आणि त्यांच्या बचतीचे रूपांतर करण्यासाठी विविध पर्याय समजून घेण्यास सक्षम करू शकतात. गुंतवणुकीमध्ये, विम्याद्वारे संरक्षण आणि या पर्यायांच्या गुणधर्मांची वास्तववादी ओळख. वित्तीय सेवा (बँकिंग), विविध प्रकारच्या सेवांची उपलब्धता आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षित करणे आणि वित्तीय सेवांचे ग्राहक म्हणून विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
याप्रसंगी बँक व्यवस्थापक
प्रणित यावलीकर व तेथील कर्मचारी स्वप्निल यावले यांनी याबाबत माहिती दिली.
स्वप्निल यावले यांनी बँकिंगच्या कामकाजा बद्दल माहिती दिली.
विद्यार्थ्यांना बँकिंग म्हणजे काय आणि ते व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कसे उपयुक्त आहे याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रतिभा काकडे,सतीश तागडे,आशिष शहाणे,काजल वडेकर, आचल टेकाडे यांनी पार पडला. या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.