ब्रेकिंग न्यूज
दुदैवी ! पाण्याच्या टाकी कोसळल्याने पाच मजुरांचा दबून मृत्यू

भोसरी / विशेष प्रतिनिधी
भोसरीतील सदगुरू नगर येथे निर्माणधींन पाण्याची टाकी कोसळल्याने त्या खाली दबून पाच मजुरांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे सगळे मजूर याच भागात मजूर कॅम्प मध्ये राहत होते. दिवाळी पूर्वी घडलेल्या या घटनेने मजुरांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे.प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
प्रशासनाचे तात्काळ पाऊल –
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवार्ड होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये संताप –
या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांनी बांधकाम कंपन्यांच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1