हटके

करवाचौथ च्या दिवशीच पत्नी ने  प्रियकराशी केले लग्न 

Spread the love

मऊ (युपी)/ नवप्रहार डेस्क

                  देशभरातील महिला आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी करवाचौथ चा उपवास ठेवत असतांना मऊ मध्ये मात्र विचित्र प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने याच दिवशी प्रियकरा सोबत लग्न केले आहे. पती घरी उपस्थित नसताना तिने लग्न केलं. लोकांनी या लग्नाचा व्हिडीओही बनवला जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

करवाचौथच्या दिवशी गौरीशंकर मंदिरात हे लग्न करण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेचे आधीच लग्न झालं होतं. असं असतानाही तिने तिच्या बॉयफ्रेंडशी आता दुसरं लग्न केलं. नवऱ्याला याबाबत समजताच तो घरी आला. त्याने पत्नीला जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. गोंधळ वाढताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावलं.

पत्नीने बॉयफ्रेंडसह पोलीस ठाणं गाठलं. पण नवरा पोहोचला नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला नावाच्या तरुणीचं लग्न आकाशसोबत झालं होतं. पण प्रमिलाचा आधीच एक बॉयफ्रेंड होता, ज्याचं नाव विजय शंकर आहे. लग्नानंतरही प्रमिला आणि विजयचं अफेअर सुरूच होतं.

१० दिवसांपूर्वीच प्रमिलाने आकाशला सोडून विजय शंकरसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. ती त्याच्यासोबत पळून गेली. पण दोन्ही कुटुंबीयांनी समजवल्यानंतर ती नवऱ्याकडे परत आली. यानंतर आकाश काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. तो २० ऑक्टोबर आला, म्हणजेच करवाचौथच्या दिवशी आला. तेव्हा घरात कोणीच नव्हतं, हिच संधी साधून प्रमिलाने पुन्हा विजयसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

गौरीशंकर मंदिरात प्रमिला आणि विजय यांचं लग्न झालं. यावेळी अनेक लोक तेथे जमा झाले. याची माहिती आकाशला मिळताच तो रात्री पोलिसांसह प्रमिलाच्या घरी पोहोचला. मात्र दोन्हीकडच्या लोकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close