अ.भा.कुनबी समज मंडळातर्फे “उपवर युवक युवती परिचय मेळावा व सोयरिक पुस्तिका प्रकाशन नियोजन सभा व दसरा संमेलन संपन्न.”
मनोज भगत
हिवरखेड
अकोला येथे दी.२०.१०.२०१४ रोजी
अ.भा.कुणबी समज बहुउद्देशीय मंडळातर्फे “उपवर युवक युवती परिचय मेळावा व सोयरिक पुस्तिका प्रकाशन नियोजन सभा व दसरा संमेलन संपन्न झाले.या सभेच्या व संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.रामेश्वर फुंडकर हे होते तर प्रमूख उपस्थिती मा.प्रा.डॉ.मोहन खडसे,मंडळाचे माजी अध्यक्ष मा.श्री.महादेवराव कौसल, मा.श्री.केशवराव टोहरे, समाज बांधव ह.भ.प.श्री.महेश महाराज मारवाडी, जिल्हाध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ गावंडे, उपाध्यक्ष श्री.राजुभाऊ आढे, कोषाध्यक्ष मा.श्री.देविदासजी म्हैसने, डॉ.गजानन वाघोडे, संचालक मा.प्रा.डॉ.विवेक हिवरे हे उपस्थित होते.
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल गावंडे यांनी केले व सर्व जिल्हा कार्यकर्त्यांचे शब्दसुमनानीं स्वागत केले. उपवर युवक युवती परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिका प्रकाशन व नियोजना संदर्भात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्या नुसार निमंत्रित कार्यकर्ते ऊपस्थित होते. या सभेमध्ये सर्कल मधील प्रत्येक गावाची जबाबदारी कार्यकर्त्याना देण्यात आली व उपवर युवक व युवतीचे परिचय पत्र व जाहिराती कशा संकलीत करता येतील त्याबद्दल माहिती देण्यात आली.तसेच अकोल्या जिल्ह्यातील कुणबी समाजामधील दोन /तिन एकर शेती,मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत असलेल्या समाज बांधवांचें पाल्य की ज्यांनी १० वी / १२ वी मध्ये ९०%चे वर मार्क्स घेतलेले आहेत. अशा विद्यार्थ्याची माहिती मंडळाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच या सभेत मंडळाकडून पुढील शिक्षणाकरिता दानशूर समाज बांधवांना आव्हान करण्यात आले व अशा हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांची दोन ,चार वर्षाची फि जरी भरली तर त्या विद्यार्थ्याला व त्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल आणि त्यां विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होऊ शकेल. या आव्हानाला प्रतिसाद देत उपस्थित मा.श्री. गजानन दांदळे यांनी स्व.वसंतराव दांदळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दर वर्षी ५१०००/- रुपये गरिब होतकरू विद्यार्थ्याकरिता देण्याचे जाहीर केले.
अकोल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याना आव्हाहन करण्यात आले की प्रत्येकांनी आपली स्वतःची जाहिरात कमीत कमी पाव पेज १०००/- रुपयाची देऊन सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. आपल्या नातेवाईकांना परिचय पत्र, जाहिरातीची माहिती देण्यात यावी.
तसेच या प्रसंगी अमरावती विभागीय शिक्षण मंडळ व राज्य शिक्षण मंडळ पुणे या मंडळावर अशासकीय सदस्यपदी निवड झाल्या बद्दल प्रा.नरेंद्रजी लखाडे यांना व २०२४ महात्मा फुले उत्कृष्ट राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री.आशिषभाऊ हेलगे,नवनियुक्त मंडळाचे सल्हागर ऍड.मंगेश शेंडे,ऍड.अनिलभाऊ ढोले यांचा
मंडळाच्या वतीने सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी ज्येष्ठ समाज बांधवांनीं मार्गदर्शन केले व आपल्या सूचना सर्वांच्या सामोर मांडल्या.या प्रसंगी सामाजिक विषयावर चर्चा कऱण्यात आली. सूत्र संचालन श्री.सुरेश फाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गजाननभाऊ लासुरकार केले.या कार्यक्रमाला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.