विदेश

त्याला होते तीन लिंग पण हे सगळ्यांना त्याच्या मृत्यू नंतर कळले 

Spread the love

ब्रिटन / इंटरनॅशनल डेस्क 

                    मनुष्याच्या शरीराची रचना जवळपास एक सारखी असते. मग ती स्त्री असो पा पुरुष . पण यातही काही पुरुष अथवा स्त्री अशी असते ज्यांच्या शरीर रचनेत थोडा फार बदल असतो. हजारो लाखोंतून एखाद्या व्यक्ती सोबत असे घडते असे शास्त्रज्ञ सांगतात. ब्रिटन मधल्या एका व्यक्ती सोबत ही असेच घडले. या व्यक्तीला तीन लिंग होते. पण हा सगळा प्रकार त्याच्या मृत्यू नंतर समोर आला. कारण त्याने मरणोपरांत त्याने आपले शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता.

बर्मिंगहॅम मेडिकल स्कूल विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जेव्हा या व्यक्तीच्या शरीराचे शवविच्छेदन केले, तेव्हा त्यांना लक्षात आले की, सदर व्यक्तीला आयुष्यभर तीन लिंग असल्याचे माहितच नव्हते. ही माहिती बाहेर आल्यानंतर आता जगभरात याबाबत कुतुहल व्यक्त केले जात आहे.

सदर मृत व्यक्तीची उंची सहा फूट असून तो बाहेरून सामान्य माणसाप्रमाणेच दिसत होता. परंतु शवविच्छेदनातून समोर आले की त्याच्या मांडीजवळ आणखी दोन लिंग होते. मेडीकल केस रिपोर्ट्स या जर्नलसाठी लिहिलेल्या शोधनिबंधात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात दोष असून त्याला ट्रिफॅलिया असेही म्हटले जाते. हा दोष प्रत्येक ५० ते ६० लाख जिवंत लोकांमधून कुणा एका व्यक्तीमध्ये आढळून येतो.

संशोधकांनी सांगितले की, सदर व्यक्तीचे शरीर बाहेरून तपासले असता वरकरणी एकच मुख्य लिंग असल्याचे दिसत होते. मात्र शवविच्छेदन केल्यानंतर मांड्याजवळील भागात आणखी दोन लिंग असल्याचे आढळून आले. तसेच मुख्य आणि दुसऱ्या लिंगाजवळ सामान्य मूत्रमार्ग असल्याचेही शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या लक्षात आले आहे. हा दोष सदर व्यक्तीच्या किंवा इतर डॉक्टरांच्या लक्षात आला की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही, असेही शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. कारण या व्यक्तीने इंग्विनल हर्नियाची शस्त्रक्रिया करून घेतली होती.

अशाप्रकारचे पहिले प्रकरण २०२० साली इराकच्या नवजात बालकामध्ये आढळून आले होते. एखाद्या जिवंत माणसात ही स्थिती दिसल्याची ही पहिलीच घटना नोंदविली गेली होती. अनेकदा जन्मजात बालकात जर अतिरिक्त लिंग शरीराबाहेर दिसत असेल तर डॉक्टर शस्त्रक्रिया करून ते काढून टाकतात. परंतु काही वेळा लिंग शरीराच्या आत असल्यामुळे ते दिसून येत नाही, असेही या संशोधन अहवालात म्हटले आहे.

ट्रिफॅलिया सारख्या स्थितीमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि प्रजननाच्या समस्या उद्भवू शकतात, असेही संशोधकांनी सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close