हटके

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसत आहे दारूची ताकद 

Spread the love

                  दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा काही नेम नसतो. दारूच्या नशेत माणूस वाट्टेल ते बडबडतो. आपण काय करतो आहे याचे सुद्धा त्याला भान नसते. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दारूच्या नशेत असलेल्या म्हाताऱ्याला दुचाकी चालक बाईक च्या मागे बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण मागे बसलेला म्हातारा असे काही करत आहे की रस्त्यावरील लोकं त्यावर कॉमेंट्स करत आहेत. चला तर पाहू या काय आहे प्रकरण ./

सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे जी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.

दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा बाईकच्या मागे बसले आहेत. दारुच्या नशेत त्यांना बिलकूल शुद्ध नाहीये, त्यामुळे त्यांना स्वत:ला सावरणंही कठीण जातंय. त्यांना बाईकवर बसायलाही येत नाहीये, अशातच ते बााईकवरुन मागे लटकताना दिसत आहेत. एवढचं नाहीतर विशेष म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला याची काहीच कल्पना नाहीये. मागच्या वाहन चालकांनी सांगितलं तेव्हा त्यांना कळालं मात्र तोपर्यंत हे आजोबा गाडीवरुन पूर्णपणे खाली पडले होते. बाईकचा वेग कमी होता म्हणून नाहीतर आजोबांना दुखापत झाली असती.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ funky_joker_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने आश्चर्यचकित होऊन विचारलं आहे की, हा काय प्रकारे ते सांगा. त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, तो मद्यपान केल्यानंतर खरोखरच उडाला. आणखी एका यूजरने लिहिलं, ये है हस्ती का बस्ती ब्रो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close