जिजाऊ ब्रिगेट तर्फे नारी शक्ती जनजागृती अभियान
दर्यापूर / प्रतिनिधी
जिजाऊ ब्रिगेड तालुका दर्यापूर
तर्फे.जिजाऊ प्रीस्कूल दर्यापूर येथे
नवरात्री उत्सव नारी शक्ती जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजाऊ मा साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आला
विद्यार्थिनींना नकोशा प्रसंगी सहजपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य तिच्यात निर्माण व्हावे यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून, नारीशक्ती जनजागृती अभियानाचे कार्य राबविले जात असल्याचे मत, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवमती शिल्पाताई लोडम यांनी व्यक्त केले.
सदरील जनजागृती अभियान नवरात्रोत्सवात महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून 10 ऑक्टोबर रोजी दर्यापूर येथील जिजाऊ प्री स्कूल प्राथमिक शाळा दर्यापूर येथे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बोलताना जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवमती शिल्पाताई लोडम यांनी किशोरवयीन मुली शारीरिक मानसिक भावनिक बदलाच्या काळात गोंधळलेल्या स्थितीत असतात त्यांची स्वतःची निरोगी प्रतिमा त्यांच्या मनात तयार करण्यासाठी बाहेरील प्रदूषित झालेल्या वातावरणात विद्यार्थिनीला संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन केले
तसेच शिक्षकांना सुद्धा एक शिक्षक व एक पालक म्हणून नवरात्र उत्सवात त नऊ रंगाच्या कपड्यांना महत्व न देता आपल्या नऊ महानाईकांच्या विचारांची माहिती विद्यार्थिनींना देऊन त्यांना कठीण प्रसंगी या नायिकांनी कसे स्वतः मार्ग काढून पुढे गेल्या असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावे
याचे मार्गदर्शन शिवमती शिल्पा ताई लोडम यांनी केले
तसेच जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शिवमती शिल्पाताई गावंडे यांनी सुद्धा नारीशक्ती म्हणजे काय आणि विद्यार्थिनी आजच्या काळात कसे बलाढ्य बनावे याचे मार्गदर्शन केले
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष शिवमती स्वाती कोरडे जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य शिवमती पूजा कोकाटे, शिवमती प्रीती चौधरी, शिवमती रोशनी चौधरी, शिवमती स्नेहल बोडके, शिवमती तनुजा घोगरे ,शिवमती वैष्णवी साखरे, शिवमती पूजा म्हस्के म्हस्के ,शिवमती तनिष्का शर्मा, शिवमती साक्षी बर्डे, शिवमती दुर्गा पाटकर इत्यादी उपस्थित होते.