क्राइम

पत्नीचे पती ने प्रियकरा सोबतचे ते कृत्य पाहिले अन गमावला जीव 

Spread the love

गरियाबंद (छत्तीसगड)/ नवप्रहार डेस्क

                 घरजावई असलेल्या रोहित ने पत्नी समारीबाई आणि तिचा प्रियकर प्रकाश याला नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे संतापलेल्या प्रकाश आणि समारीबाई बाई ने लोखंडी रॉड ने त्याचावर वार करून त्याची हत्या केली. आणि मृतदेह 20 किमी लांब राष्ट्रीय महामार्गवर पुरला. मुलगा घरी न आल्याने रोहित च्या वडिलांनी चौकशी केली असता घटना उघड झाली.

                    उपलब्ध माहिती नुसार 33 वर्षीय रोहित हा ढोल सराईचा रहिवासी होता. त्याचे लग्न गरियाबंद येथील सुमारीबाई सोबत झाले होते. आणि तो घरजावई म्हणून राहत होता . समारीबाई  चे घरासमोर किराणा दुकान असलेल्या प्रकाश कश्यप नावाच्या 49 वर्षीय व्यक्ती सोबत लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते.

                     एक दिवस रात्री रोहित ने समारीबाई आणि प्रकाश ला नको त्या अवस्थेत पाहिले. आता ही बाब जगजाहीर होईल या भीतीने समारीबाई आणि प्रकाश ने मिळून रोहित वर लोखंडी रॉड ने प्रहार करून त्याचा खून केला आणि मृतदेह 20 किमी लांब राष्ट्रीय महामार्गा शेजारी गाडला. रोहित अधुनमधून आपल्या घरी जात होता. पण अनेक दिवस होऊन देखील रोहित घरी न आल्याने आणि त्याच्याशी काही संपर्क होत नसल्याने त्याचे वडील रोहित च्या सासुरवाडीत आले.

          तेव्हा त्यांना रोहित आंध्रप्रदेशात कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. रोहित च्या वडिलांना शंका आली. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांना रोहित आंध्रप्रदेशात गेल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नाही. तेव्हा त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली असता समारीबाई आणि प्रकाश ने मिळून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close