हटके

विद्यार्थिनी बनल्या ‘ रणरागिणी ‘  छेड काढणाऱ्या कंडक्टरला तरुणींनी धुतले 

Spread the love
 

रत्नागिरी / नवप्रहार डेस्क 

                    कितीही कायदे कडक केले आणि शिक्षा केली तरी महिलांवरील अत्याचारात अंकुश लागताना दिसत नाही. त्यामुळे आता महिला आणि तरुणींनाच स्वरक्षणाराठी ‘ रणरागिणी ‘ चा अवतार धारण करावा लागेल असे वाटत आहे. बस च्या कंडक्टरने मैत्रिणीची छेड काढल्यावर विद्यार्थिनींनी कंडक्टरला असे धुतले की मुलीच्या त्या कृत्याची जोरदार चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्ह्याील दापोली येथे कॉलेजच्या विद्यार्थींनी आदर्शवत काम केलं असून त्यांच्या या धाडसाचं कौतूक होत आहे. एका मुलीची छेड काढणाऱ्या कंडक्टरला तिच्या मैत्रिणींनी चांगलंच धुतलंय. दापोली-पंचंनदी बसमध्ये चढलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे. या विद्यार्थींपैकी एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगलंच सुनावल आणि धोपटलंही आहे. मुलींचा हा रौद्रअवतार पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली होती, बस थांबवून कंडक्टरला चोप दिल्यामुळे दाभोळमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मर्दानी बनून मुलीने कंडक्टरला चांगलाच धडा शिकवलाय. तसेच, याप्रकरणी कंडक्टरची दाभोळ पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close