राजकिय

निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचा ठाकरे यांना धक्का 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखेची कधीही घोषणा होऊ शकते. त्या पार्शभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागले असून उमेदवाराच्या चाचपणीला लागले आहेत. अश्यातच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

येत्या १० ऑक्टोबरला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. हा विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हिकमत उढाण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते राजेश टोपे यांच्याकडून अवघ्या 3 हजार 409 मतांनी पराभूत झाले होते.

यंदाही त्यांनी टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते 10 तारखेला शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हिकमत उढाण यांच्या साखर कारखान्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, तिथेच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close