जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात लागली ती पाण्याची बॉटल आणि ……
अधिकाऱ्याच्या मनाविरोधात जर एखादी गोष्ट होत असेल आणि त्याने कारवाईचे मनावर घेतले तर खालच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही स्तरावर जाऊन कारवाई करावी लागते. याचेच उदाहरण उत्तरप्रदेश मध्ये पाहायला मिळाले. एका मिटिंग दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या पुढे पाण्याची बॉटल ठेवण्यात आली.त्यांचे लक्ष त्या बॉटल च्या रॅपर वर गेले. आणि क्षणात त्यांच्यातील अधिकारी जागा झाला. त्यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. चला तर जाणून घेऊ काय आहे प्रकरण .
भारतात नामांकित ब्रँड ची नक्कल करून अगदी हुबेहूब त्याच्याच सारखा प्रॉडक्ट बनविणे काही नवीन बाब नाही. फक्त कायद्याच्या कचाट्यातुन वाचण्यासाठी नावात थोडा फार बदल करतात. पण हुशार जिल्हाधिकाऱ्यांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले आणि कारवाईचे आदेश दिले. अनेकदा तुम्हीही नामवंत ब्रॅण्डचे ड्युप्लिकेट ब्रॅण्ड बाजारात पाहिले असतील. मात्र ही अशी चोरी पकडली गेली की काय होतं याचा प्रयत्न नुकताच उत्तर प्रदेशमधील बागत येथे आला.
कसा समोर आला हा प्रकार?
उत्तर प्रदेशमधील बागपतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर एका नामवंत कंपनीच्या नावाला साधर्म्य असणाऱ्या कंपनीची बाटली मिनरल वॉटरची बाटली म्हणून ठेवण्यात आली. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हायातील खाद्य विभागात एकच गोंधळ उडाला. खऱ्या नावात थोडा फेरफार करुन अगदी हुबेहुब ब्रॅण्डेड पाणी वाटावं अशा या बाटल्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांना धक्काच बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून याबद्दलची माहिती दिली.
त्यानंतर नेमकं घडलं काय?
थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच आक्षेप नोंदवल्यानंतर अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘बिसलेरी’ या नामवंत ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या ‘बिसल्लेरी’, ‘बिसलारी’, ‘बिलसेरी’ या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या असलेल्या दुकानांवर तसेच गोदामांवर छापेमारीला सुरुवात केली. या छापेमारीमध्ये मोठ्याप्रमाणात बनावट मिनरल वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या पुढाकारानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी तातडीने या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक खाद्य सुरक्षा आयुक्त मनवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमने छापेमारी केली. त्यामध्ये बनावट नावाने चालणाऱ्या कंपनीतील बाटल्या जप्त करण्यात आल्या.
एका घरात सापडला गुप्त कारखाना
‘बिसलेरी’ ब्रॅण्डच्या नावाशी मिळत्या जुळत्या ‘बिसल्लेरी’, ‘बिसलारी’, ‘बिलसेरी’ या सारख्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या दुकानादारांवर कारवाई करण्यात आली. तसेच मोठ्याप्रमाणात या नकली ब्रॅण्डच्या बाटल्या जाप्त करण्यात आल्या. याच कारवाईदरम्यान बागपतमधील गौरीपूर जवाहर नगर गावामध्ये कोणताही परवाना न घेता एका घरात पाण्याच्या बाटल्या भरुन या खोट्या ब्रॅण्डखाली विकण्याचा उद्योग चालू असल्याचा भांडाफोडही झाला. या कारखान्यावरही पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईचे व्हिडीओही समोर आलेत…
या कारखान्यांना बाटल्या पुरवणाऱ्यांविरोधातही कारवाई झाल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईत जप्त केलेल्या बाटल्या जाळून नष्ट करण्यात आल्या. त्यानंतर त्या गाडून टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.