त्या तरुणीवर तीन नराधमांनी चार वेळा केला आळीपाळीने बलात्कार

अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड
कोंढवा / नवप्रहार डेस्क
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन तरुणांनी चार वेळा तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या सोबत च्या मित्राला जीवाशी ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेला तीन दिवस लोटल्यानंतर देखील अद्याप पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. डोंगराळ भाग, मोबाईल रेंज, सीसीटीव्ही कॅमेर्याचा अभाव अशा विविध समस्यांमुळे पोलिसांना देखील तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येते. मित्राचे हात शर्टाने बांधून आणि पाय बेल्ट ने बांधून आणि तरुणीला बांबूने मारून
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, कोंढवा पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तरुणीच्या मित्राला तिघांनी परत शिवीगाळ केली. तर तरुणीला लाकडी बांबूने मारले. कोयता हातात घेतलेल्या नराधमाने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तिच्या मित्राचे हात शर्टाने बांधून, पाय बेल्टने बांधले. मित्राला मारहाण केली. यानंतर कोयता हातात असलेला नराधम तरुणीला टेबलपाइंटच्या खालील बाजूस घेऊन गेला. तरुणीने त्याला विरोध करत तुम्हाला काय बोलायचे, ते इथेच बोला… असे म्हटले. तरी देखील त्याने तरुणीला जबरदस्तीने खाली ओढले. तरुणीसोबत त्याने बळजबरी करण्यास सुरुवात केली. तरुणीने विरोध केला. त्यावेळी त्या नराधमाने तिच्या मित्राला मारून टाकण्यास सांगेन, अशी धमकी दिली. तरुणी जिवाच्या अकांताने टाहो फोडत होती. मात्र, डोक्यात सैतान संचारलेल्या त्या नराधमाने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले. तरुणी प्रत्येकवेळी त्याला विरोध करत होती. मात्र, तो सतत तिच्या मित्राला मारून टाकण्याची धमकी देत होता. तरुणी हात जोडून त्यांना आम्हाला सोडून देण्याची विनंती करत होती. मात्र, त्यानंतर देखील दुसर्या नराधमाने तिच्यासोबत अत्याचार केला. त्यानंतर हातात चाकू असलेल्या तिसर्या नराधमाने देखील हेच कृत्य केले. यानंतर पुन्हा पहिल्या नराधमाने तरुणीवर अत्याचार केला. तिघांनी तरुणीसोबत बलात्काराबरोबरच अनैसर्गिक कृत्यदेखील केल्याचे पुढे आले आहे.
नेमकं काय घडलं… त्या दिवशी…
अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना आहे. गुरुवारी (दि. 3) तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. त्या वेळी रात्रीचे पावणे अकरा वाजले असतील. दोघे टेबलपॉइंटवर फिरत होते. पंधरा मिनिटानंतर तिघे नराधम तेथे आले. एकाच्या हातात लाकडी बांबू, दुसर्याच्या हातात कोयता तर तिसर्याच्या हातात चाकू होता. तिघांनी तरुणीच्या मित्राला तू एवढ्या रात्री येथे काय करतो… असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणीलादेखील एवढ्या रात्री मुलासोबत काय फिरतेस, असे म्हणत धमकावले. यानंतर तरुणीकडील दागिने काढून घेतले. पुढे तरुणी आणि तिच्या मित्राला काही अंतरावर पठाराच्या उताराच्या दिशेने घेऊन गेले.
अत्याचारानंतर दोघांना भरला होता नराधमांनी दम
तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कोयताधारी नराधम तिला मित्राजवळ घेऊन आला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला आम्ही जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. आम्ही जोपर्यंत तुम्हाला आवाज देत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर पडायचे नाही, जागेवरच थांबायचे, असे सांगितले. वेदनेने विव्हळत, मित्रासोबत तरुणी तेथेच थांबली. जवळपास पंधरा मिनिटे दोघे तसेच थांबून होते. काही वेळानंतर तरुणीने मित्राचे बांधलेले हातपाय सोडले. यानंतर तरुणी आपल्या घरी आली. तिच्यासोबत झालेला प्रकार बहिणीला सांगितला. पुढे तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
.