मोर्शी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी
मोर्शी। / ओंकार काळे
शहराला एक दिवस आड होणारा पाणी पुरवठा बंद करून दररोज पाणी पुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन डॉ प्रदीप कु-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे प्रशासक व तहसीलदार राहुल पाटील यांना देण्यात आले.
मोर्शी शहराला नगर परिषदेद्वारे होणारा पाणी पुरवठा पूर्वीपासून दररोज व नियमित होत होता. परंतु दि. १ ऑक्टोम्बर पासून नगर परिषदे तर्फे शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा
करण्याचे सुरु केले आहे याकरिता विजेचे बिल कमी होईल त्याचा नगर परिषद वरील भार कमी होईल हे कारण दिले आहे.
शहरात पाण्याचे देयक नियमित भरणारे असंख्य ग्राहक आहे त्यांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. एक दिवसा आड पाणी पुरवठा आल्यामुळे दोन दिवसा करिता पाणी जमा ठेवावे लागते व त्याची व्यवस्था नागरिकांकडे नाही. तसेच काही नागरिकांनी पाण्याचे देयक न भरल्याने पाणी बिलाची वसुली न झाल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे असे नप चे म्हणणे आहे.वास्तवीक नगर परिषदे तर्फे वर्षभरात वसुली बद्दल काही कारवाई केली नाही तसेच नगर परिषदद्वारा सध्या हि पाण्याचे देयक चार महिने उशिरा देण्यात येते त्यामुळे हि वसुली वेळेत होत नाही