महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
हिवरखेड:- हिवरखेड ग्राम वाचनालय हिवरखेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व देशाचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वरील कार्यक्रम मा.श्री साहेबरावजी मो.पाटील यांचे अध्यक्षते खाली वप्रमुख पाहुणे मा.श्री पंजाबराव ढोरे सर.मा.श्री देवेंद्रभाऊ गोरडे माजी सरपंच श्री.नानासाहेब धरामकर,वाचनालयाचे पदाधिकारी तसेच वाचकवर्ग, प्रतिष्टीत नागरीक यांचे उपस्थिति त अनुप बगेकर या हिवरखेड येथील तरुणाने डॉ. एस आर. रंगनाथन वाचनालयाचे जनक यांचा स्केच फोटो स्वत काढुन वाचनालयाला भेट दिला .त्या बद्यल त्या विद्यार्थ्यांच्या सत्कार शाल व श्रीफळ देउन करण्यात आला. असता महात्मा गाधीजी व लाल बहादुर शास्त्री यांचे जीवनचरित्रा वर प्रकाश टाकुन मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे झाली .या प्रसंगी वाचनालयाचे सचिव निंभेकर सर यांनी प्रास्ताविक केले.व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्री अनंतराव फांजे यांनी केले.या प्रसंगी वाचनालयाचे पदाधिकारी ,सदस्य तसेच कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थीत होते.या कार्यक्रमा करिता पंकज भडके व भूषण बेलसरे व इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली