व्हेल माशाच्या उलटीला का मिळते कोट्यावधी ची किंमत
व्हेल माशाची उलटी विकायला आलेल्या तिघांना कल्याण क्राईम ब्रँच कडून अटक
मुंबई / नवप्रहार डेस्क
६ कोटी २०लाख रुपयांची व्हेल माशाची उलटी घेऊन ती विक्री साठी आलेल्या तिघांना कल्याण क्राईम ब्रँच च्या चमुने अटक केली आहे. आता व्हेल माशाच्या उलटीत असे काय असते ?. की त्यामुळे ती इतकी महाग विकल्या जाते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? पाहूया नेमकं काय असतं व्हेल माश्याची उलटी.
कल्याण क्राईम ब्रँच ला गोपनीय माहिती मिळाली होती की काही लोकं व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी बदलापूर पाईपलाईन जवळ येणार आहेत. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि अनिल भोसले, अंकुश माळी, लक्ष्मण पाटील अशी तिघा आरोपींची नावे आहेत. तिघे पनवेल परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याजवळून सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी उलटी कुठून आणली? कुणाला विक्री करण्यासाठी आणली? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे.
नेमकं काय घडलं?
व्हेल माशाची उलटीची अनधिकृतरित्या विक्री करण्यासाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवर सापळा रचला. संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी (Whale’s vomit) आढळली. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्काळ गाडी मधील अनिल भोसले ,अंकुश माळी ,लक्ष्मण पाटील या तिघांना ताब्यात घेत अटक केली.
आरोपी उलटीचं काय करतात?
व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादनासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढले आहेत.