माझ्या लाडक्या बहिणींचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा / प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अभूतपूर्व यश वास्तवात नेमके कसे आहे हे आज लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव इथे पार पडलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ मेळाव्याच्या निमित्ताने पहायला मिळाले. मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे मला या मेळाव्यास उपस्थित होत्या.
यावेळी मंचावरून त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा साकोली विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष आणि भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी संबोधित करताना ‘आपला देवा भाऊ’ म्हणजेच मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच या योजनेचा लाभ आज संपूर्ण राज्यातील महिलांना मिळाल्याचे मी सांगितले. तसेच या योजनेमुळे महिला स्वयंपूर्ण झाल्या असून त्यांना त्यांच्या गरजा यातून पूर्ण करता येत आहात. केवळ महायुती सरकारच्या काळातच अशी योजना सुरू होऊ शकते आणि ती पुढे चालू राहू शकते. त्यामुळे महायुती सरकारचे हात भविष्यातही भक्कम करण्याचे मी सर्व भगिनींना आवाहन केले.
यावेळी माजी आमदार मा. श्री. बाळाभाऊ काशिवार, भाजप भंडारा जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. तु. रा. भुसारी सर, भाजपा महामंत्री मा. श्री. विनोदजी ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. वसंताजी एंचिलवार, तालुका अध्यक्ष मा. श्री. प्रमोदजी प्रधान, जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. प्रतिकजी उईके, महिला मोर्चा अध्यक्ष मा. कुंताताई शहारे, पिंपळगाव कोहळीच्या सरपंच अस्मिताताई लांडगे, पिंपळगावच्या उपसरपंच गिताताई परशुरामकर, ग्रामपंचायत सदस्य केवनाताई परशुरामकर,सौ . कल्पना ताई जाधव तालुका अध्यक्ष एनसीपी,एनसीपी शहर अध्यक्ष गिताताई लंजे, रजनीताई कुथे, उषाताई झोडे, वैशालीताई हटवार, प्रियांकाताई टेंभरे, संघमित्राताई टेंभरे, नगरसेवक श्री. राजूजी पठाण, नगरसेवक श्री. सुरेशजी नागपुरे, महामंत्री श्री. भरतजी मेहेंदळे, श्री. विनोदजी नाकाडे, श्री. भिवराजजी परशुरामकर, श्री. गिरीधरजी परशुरामकर, श्री. विजयजी खरकाटे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.