शाशकीय

राज्य सरकारचे आणखी एक पाऊल : जवळच्या रुग्णालयात हृदय विकाराच्या रुग्णांना मोफत औषधे मिळणार 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

                 जीवनशैलीत झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडत आहे. अनियमित खानपान  आणि  जंक फूड च्या अती सेवनाने लहान वयाच्या मुलांना देखील अटॅक येत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या संख्येत वाढ़ झाली आहे. हृदय विकाराचे वाढते प्रमाण पाहता राज्य सरकारने आता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत क्लॉट बस्टिंग औषध म्हणजेच रक्ताची गुठळी विरघळणारे औषध उपलब्ध करून  देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.

पहिली पायरी म्हणून, महाराष्ट्र सरकारने क्लॉट-बस्टिंग औषध-टेनेक्टेप्लेस-चा समावेश अत्यावश्यक औषधाच्या  यादीत केला आहे. ज्यामुळे त्याची किंमत कमी होईल, असे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालये या औषधासाठी सुमारे ५० हजार रुपये आणि इंजेक्शनचे शुल्क आकारतात.

पुढील दोन महिन्यांत, राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिकांना टेनेक्टप्लेसची गरज असलेल्या रुग्णांना कसे ओळखावे आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जे रुग्णवाहिकेत देखील दिले जाऊ शकते. जिल्हा रुग्णालयांमध्ये 23 कार्डियाक कॅथ लॅबच्या निर्मितीलाही मान्यता दिली आहे. जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयासह सर्व सरकारी रुग्णालयात हृदयविकारावर उपचार मिळणार आहेत.

अनेक नागरिकांनी हृदय विकाराचा  धसका घेतला आहे. तरुणपणातही हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्यायाम करताना, गाडी चालवताना, अगदी स्वस्थ बसलेले असताना अनेकांना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. मात्र आता सरकारी रुग्णालयात उपचार होणार असल्यानं उपाचाराची धावाधाव कमी होऊन रुग्णाचे प्राण वाचणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close