अपघात

भजन मंडळीला घेऊन निघालेला टेम्पो नाल्यात कोसळला .: २. मुली पाण्यात गेल्या वाहून 

Spread the love

खांबा वडेगाव दरम्यानची घटना 
साकोली (भंडारा )शमीम आकबानी
भजन मंडळीं एका टेम्पोतून स्व:गावी निघाले असता नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो पाण्यात कोसळला. या अपघातात टेम्पो मधील १५ ही जण नाल्याच्या पाण्यात कोसळलेत. २ वर्षीय आणि ५ वर्षीय अशा दोन मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात तर १३ जण पाण्याच्या बाहेर निघाले.१३ ही जण किरकोळ जखमी आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच साकोली तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान जेसीबी आणून नाल्यात पडलेला टेम्पो बाहेर काढून एसडीआरएफ च्या पथकाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू केला आहे. साविस्तर बातमी अशी, भिवखिडकी येथे ताज मेहंदी बाबा यांच्या भजनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २६ सप्टेंबरला होता. तो कार्यक्रम आटोपून शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबरला पहाटे चार वाजता भीवखिडकी वरून हा टेम्पो निघाला. दरम्यान निघालेला १५ लोकांचा समावेश असलेला टेम्पो साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव येथील नाल्यामध्ये उलटला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार निलेश कदम, साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोला पाण्यातून काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आली. या टेम्पोतील १३ जन सुखरूप बाहेर निघाले. वृत्त्त लीहीपर्यंत दोन मुलींचा शोध मात्र लागलेला नाही. खांबा येथीलच चौधरी आणि वाघाडे यांच्या दोन वर्षीय व एक चार वर्षीय मुलीचा या वाहून जाणाऱ्या मध्ये समावेश आहे…

.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close