लाहोटी महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा :
: रसायनशास्त्र विभागाचे आयोजन
मोर्शी./ ओंकार काळे
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.एन.चौधरी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.रवी धांडे,आयक्युएसी समनव्यक डॉ आतिष कोहळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गजानन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ओझोन दिनाविषयी अनमोल मार्गदर्शन केले. ओझोन म्हणजे काय,ओझोन थर क्षयाची कारणे व परिणाम, उपाययोजना, त्याचप्रमाणे व्हीएण्णा कन्वेंशन व मॉन्टेरियल प्रोटोकॉल आणि कीगाली अमेंडमेंट याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्थानिक व वैयक्तिक पातळीवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी कसे करता येईल यावर माहिती दिली.
डॉ रवि धांडे यांनी ओझोन थराचे महत्त्व जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावे तसेच
ओझोन हा वायू मनुष्याच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो,वातावरणातील ओझान हा मनुष्याला लागणाऱ्या व उपयोगात आणल्या जाणाऱ्या एअर कंडिशनर, फ्रीज तसेच वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचे संरक्षण कवच दिवसेंदिवस ऱ्हास होत चालले आहे त्यामुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे.हे प्रदूषण रोखण्यासाठी व ओझोनच्या कवचाचे संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत दृक्श्राव्य च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ शशिकांत ईखे यांनी तर प्रास्ताविक प्रा जी.डी. रावते यांनी व आभार प्रदर्शन अविनाश उल्हे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ.दिनेश पुंड,डॉ विवेक हुमने,डॉ एन आर नहाटे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.